पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ,पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना जाहीर केली आहे. मागेल त्याला शेततळे म्हणजेच वैयक्तिक शेततळे अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत असे आव्हान सरकारकडून करण्यात आलेले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत . या योजनेमध्ये सन 2023- 24 या वर्षासाठी सुमारे चार कोटी 44 लाख 44 हजार रुपये इतकी रक्कम अनुदानासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या आठ आकारमानाच्या शेततळ्यासाठी 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादित अनुदान देय राहणार आहे.
1) योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांसाठी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे?
◼️ शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
◼️ शेती ही स्वतःच्या नावावर असली पाहिजे.
◼️ शेतातील जमीन सिंचन योग्य असणे आवश्यक आहे.
◼️शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
2) ऑनलाइन अर्ज भरताना खालील कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
◼️ ओळखपत्र जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड ,मतदान ओळखपत्र.
◼️ जमीन मालकीचे पुरावे असणे आवश्यक आहे, सातबारा उतारा, ८ अ उतारा, मालमत्ता नोंद पत्र इत्यादी.
◼️ सिंचनाची गरज असल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. पाण्याचे स्त्रोत सिंचन पद्धत इत्यादी.
शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे तपासणीसाठी जाईल. अर्ज तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन पूर्व संमती दिली जाणार आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर काम पूर्ण करून शेतकऱ्यांना त्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान थेट त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे . या योजने संदर्भात अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टलवर भेट द्यावी लागेल, किंवा कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल ,असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.