बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या कांदा लिलावामध्ये पाच हजार रुपये क्विंटल 50 रुपये किलो प्रमाणे उच्चांकी दर मिळाल्याने कांद्याची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
बुधवारी बाजार समितीमध्ये 6820 कांद्याच्या गोणीची आवक झाली. यामध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला . दुय्यम प्रतीचा माल तीन हजार पाचशे रुपये हलक्या दर्जाचा माल ₹2000 क्विंटल दराने विक्री झाला. गोल्टी कांद्याला 3600 दर मिळाला तर बाजार समितीमध्ये आता गोणीतील कांद्याची आवक कमी होत आहे. शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेला माल आता कमी झाल्यामुळे आगामी काळातही दर टिकून राहतील . अशी स्थिती आहे .
दुसरीकडे येथे होणाऱ्या मोकळ्या कांद्याच्या लिलावावेळी 118 वाहने दाखल झाले. मोकळ्या कांद्याला देखील चार हजार रुपये क्विंटल दर मिळाला . दुय्यम प्रतीचा माल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दराने तर हलक्या प्रतवारीचा माल तीन हजार रुपये क्विंटल ने विक्री झाला . गोणीतील कांद्याची आवक घटली असली तरी मोकळ्या कांद्याची आवक मात्र टिकून आहे. विशेषता वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहने बाजार समितीमध्ये येत आहेत.
नाफेड मार्फत शेतकऱ्यांकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली होती तो म** पुन्हा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला जात होता. त्यामुळे कांद्याचे दर पडण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. या संस्थांकडे कांदा आता संपला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे . त्यामुळे मालाच्या मागणीत वाढ होऊन उच्चंकी दर मिळत आहेत. आता आगामी काळातील दिवाळी सणामुळे कांद्याला मागणी आहे . ते शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आहे.