दत्त इंडियाला राजू शेट्टींची मागणी मान्य, जिल्ह्यातील १५ कारखान्यांची भूमिका गुलदस्त्यात..

सांगलीमधील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याकडून स्वाभिमानीच्या मागणीपेक्षा अधिक दर देण्याचे सोमवारी रात्री अकरा वाजता मान्य करण्यात आले आहे.  त्यामुळे गेल्या 36 तासापासून वसंतदादा साखर कारखान्यासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागे घेतले आहे.

परंतु जिल्ह्यातील 15 कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये आणि गत हंगामातील 50 व 100 रुपये थकीत देणे द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून रविवारी सांगलीतील दत्त इंडिया कारखान्याच्या गेटवर आंदोलन सुरू केले.

आंदोलन सुरू झाल्यावर बैठकाही झाल्या परंतु त्या बैठका निष्फळ ठरल्या यामुळे संघटना आक्रमक झाली.  सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली,त्यातही  तोडगा निघाला नसल्याने निर्णय होत नाही.  तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

आनंदोलन सुरूच ठेवले.  त्यानंतर रात्री दहा नंतर दत्त इंडिया प्रशासनाने दर देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्त इंडिया कडून मिळालेल्या पत्राच्या अनुसरण स्वाभिमानीच्या मागण्यापेक्षा अधिक तर देण्याचे मान्य करत असल्याचे लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली.

त्यामुळे राजू शेट्टींनी वसंत दादा कारखान्यासमोर सुरू असलेली काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याची जाहीर केले.  जिल्ह्यातील इतर उर्वरित पंधरा कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील असे स्पष्ट केले. 

Leave a Reply