मागील तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवड्याातील काही भागामध्ये पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने विदर्भातील काही भागांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आजपासून पुढील तीन दिवस गारपीटीचा आणि पावसाचा इशारा दिला आहे.
आज मराठवड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली,परभणी , धाराशिव, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील वाशीम ,भंडारा, अकोला, गडचिरोली, वर्धा,गोंदीया, या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे .
यवतमाळ, चंद्रपूर ,अमरावती ,नागपूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा व मेघगर्जनेसह हलक्या पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली . काही ठिकाणी हवामान विभागाने गारपीटीचाही अंदाज दिलाआहे . तसेच ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने या भागामध्ये वारेही वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मंगळवारी अमरावती, बुलडाणा, नांदेड, लातूर, अकोला,गडचिरोली, वाशिम ,वर्धा, आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. . नागपूर, गोंदीया,भंडारा ,चंद्रपूर, या जिल्ह्यांमध्ये पावसासह काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाड्यामधील हिंगोली आणि परभणी, जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी पडतील, असाही अंदाज दिला आहे.
तसेच नांदेड व हिंगोली जिल्ह्यामध्ये बुधवारी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नागपूर ,अमरावती, गोंदीया,भंडारा, चंद्रपूर, जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे.