केंद्र सरकारने जादा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषामध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे नव्या निकषानुसार राज्यामधील ९ विमा कंपन्यांना खरीप २०२३ मधील पावणे २ कोटी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये पीकविमा काढला होता. असे सूत्रांनी सांगितले . त्यामुळे योजनेत सहभागी असेलेल्या ९ विमा कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचा विमाहप्ता मिळणार आहे. राज्यातील या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिले आहे. पीकविमाधारक शेतकऱ्यांना अजूनही खरीप २०२३ मधील विमा भरपाई मिळालेली नाही.
केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदल करताच आता विमा कंपन्या सक्रिय झालेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी नवे सूत्र किचकट असले तरी फायद्याचे आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्राने या नवीन सूत्रानुसारच दिले आहेत. त्यानंतर , विमा दावे अंतिम टप्प्यात येतील आणि भरपाईच्या रकमा केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येतील .
प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रस्तावावर घेतल्या निर्णयाची माहिती नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना केंद्राकडे पाठवावी लागेल. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या https://pmfby.gov.in/ संकेतस्थळा वरून घरबसल्या आपल्या विमा प्रस्तावाची माहिती कळेल .
शेतकऱ्यांना मंजूर झालेली भरपाई आता आधार लिंक केलेल्या बॅंक खात्यात जमा केली जाईल . शेतकऱ्याला आता मागचा तपशील देखील दिसणार आहे त्यामुळे खोटी माहिती देऊन कोणाच्या बॅंक खात्यात आपली रक्कम वळवली आहे का, याची माहिती पण पटकन शेतकऱ्याला मिळणार आहे.
विमा कंपन्यांना आणखी एक केंद्राने अट घातली आहे. विमा कंपन्या पूर्वी सरकारकडून व शेतकऱ्यांकडून विमाहप्ता घेतल्यानंतर स्वतः हिशेब करत होत्या व परस्पर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाईच्या रकमा जमा करत असे .
केंद्राच्या अखत्यारित असलेल्या ‘पीएफएमएस’कडे (सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली) कडे नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशेब केल्यानंतर भरपाई रक्कम जमा करायची आहे. त्यानंतर केंद्राच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येईल .
पीकविमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष पूर्वीच्या निकषांमध्ये शेतकऱ्यांना काही घटनांमध्ये लाभदायक ठरत नव्हते. आता नव्या निकषामध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे हित लक्षात घेण्यात आले आहे. उत्पादनामध्ये पीक कापणी प्रयोगानंतर ५० टक्के घट आली असल्यास (उदाहरणार्थ सोयाबीनची हेक्टरी ५० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असल्यास) २५ हजार रुपये म्हणजेच ५० टक्के रक्कम भरपाई शेतकऱ्याला मिळेल.
अग्रिम नुकसान भरपाई जर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये ७५०० रुपये दिली असली तर १७५०० रुपये नुकसान भरपाई मिळेल . म्हणजेच २५ हजार रुपये वजा ७५०० रुपये केले तर १७५०० रुपये शेतकऱ्यांला मिळतील . परंतु , पीक कापणी प्रयोगामध्ये नुकसान जर शून्य आले, असले तरी शेतकऱ्याला दिलेला आधीचा अग्रिम वसूल केला जाणार नाही.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्ये नुकसान भरपाई पंधरा हजार दिले असेल तर ५० टक्के पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान आल्यास मिळणारी नुकसान भरपाई ही १७५०० रुपये मिळेल . कारण की आधीच १५ हजार रुपये दिले आहे त्यामुळे विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये गृहीत धरली जाते व ५० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते .
समजा १५ हजार रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि २० हजार रुपये काढणी पश्चात नुकसानीमध्ये आधीच दिलेले असेल आणि ५० टक्के पीक कापणी प्रयोगातील नुकसान आल्यास ७५०० रुपये नुकसान भरपाई दिली जाईल . कारण आधीच ३५ हजार रुपये शेतकऱ्याला दिले असल्यामुळे केवळ १५ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम गृहीत धरून त्याच्या ५० टक्के म्हणजेच ७५०० रुपये शेतकऱ्याला दिले जातील, असे माहिती दिली आहे.
केंद्राला प्रशिक्षणासाठी प्रस्ताव
“नवे निकष शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे परंतु त्यामध्ये गुंतागुंत आहे. काही तांत्रिक मुद्देदेखील त्यामध्ये आहेत. याबाबत केंद्र शासनाशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. विमा कंपन्यांना आणि कृषी विभागाला नव्या निकषानुसार नुकसान भरपाई अचूक देण्यासाठी देखील प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. असा प्रस्ताव केंद्रालादिला आहे,” असे कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
अशी मिळणार नव्या निकषानुसार भरपाई…
(उदाहरण, सोयाबीन पिकाची प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम गृहीत धरली आहे.)
पूर्वीची पद्धत – भरपाईचा तपशील – प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे या घटकासाठी नवीन पद्धतीत दिली जाणारी नुकसान भरपाई- १२५०० रुपये- १२५०० रुपये
उत्पादनात ६० टक्के घट अपेक्षित धरुन मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिला जाणारा २५ टक्के अग्रिम (म्हणजेच ५० हजार रुपयांच्या ६० % व या ६० % पंचवीस टक्के अग्रिम) -७५०० रुपये- ७५०० रुपये —
५० टक्के नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारी भरपाई (५० हजार रुपयांच्या ५० % म्हणजेच २५ हजार रुपये)- १७५०० रुपये (७५०० रुपयांची रक्कम आधी दिलेली आहे त्यातून २५००० रुपये वजा केल्यावर २१२५० रुपये येणारी ही रक्कम आहे.) (आधी दिलेली ७५०० रुपये ही रक्कम आता ५० हजार रुपयांतून वजा करण्यात येईल . वजा करून येणाऱ्या ४२५०० रुपयांवर ५० टक्के गृहीत धरून ही रक्कम काढण्यात आली आहे.)
५० टक्के काढणी पश्चात नुकसान भरपाई आल्यामुळे मिळणारी भरपाई (५० हजार रुपयांवर ५० टक्के म्हणजेच २५ हजार रुपये)- शून्य भरपाई मिळत होती. (कारण, ७५०० + १७५०० असे २५ हजार रुपये अगोदर दिलेले असायचे)- १०६२५ रुपये मिळतील. (कारण आधी दिलेली ७५०० रुपयांची रक्कम + २१२५० रुपये असे २८७५० रुपये अगोदर शेतकऱ्याला दिलेले असेल . हेच ५०००० रुपयांतून आता२८७५० रुपये वजा केले जातील. वजा करून २१२५० रुपयांच्या ५० टक्के गृहीत धरून रक्कम काढण्यात आली आहे.)
नुकसान भरपाई १० टक्के पीक कापणी प्रयोगावर आधारित आल्यास मिळणारी भरपाई (१० टक्के ५० हजार रुपयांच्या गृहीत धरून ५००० रुपये रक्कम काढली असता .)- शून्य भरपाई मिळत होती. (कारण अगोदर २५००० रुपये दिलेले असायचे)- शून्य भरपाई मिळत असे . (कारण मध्य हंगाममध्ये प्रतिकूल परिस्थितीत अगोदर २५ % म्हणजेच ७५०० रुपये दिलेले असतात.) २५००० रुपये-३९३७५ रुपये इतकी एकूण मिळणारी प्रतिहेक्टर नुकसान भरपाई-
महत्त्वाचे ः
# एकदा नुकसान भरपाई प्रतिकूल हवामान असल्यामुळे पेरणी न करता येणे या घटकासाठी दिली की नंतरच्या आधी विमा पॉलिसी अडचणीत येत होत्या .तेच नव्या निकषातदेखील होईल.
# सोयाबीनचे उदाहरण अभ्यासले तर शेतकऱ्याला नव्या निकषानुसार १४३७५ रुपये जास्त मिळत आहेत . त्यामुळे नवे निकष शेतकऱ्यांना फायद्याचे आहेत.