विदर्भ मराठवाडयासह राज्यातील काही ठिकाणी पाच ते सहा दिवस पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतीतील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली . तसेच हवामान विभागाने काही ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज असल्याचे जाहीर केले.
हवामान विभागाने आज विदर्भातील वाशीम ,बुलडाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यात तसेच कोकणमधील रायगड,मुंबई व ठाणे या जिल्ह्यात काही ठिकाणी वीजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे . तसेच मराठवड्यातील बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील पुणे,सांगली, नगर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड याशिवाय कोकणातील रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला. तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात गुरुवारी काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये हि काही भागात विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
सिंधुदूर्ग, धाराशिव, लातूर कोल्हापूर, सांगली, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे , तर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवारी काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.












