कपाशी लागवडीची तयारी करत असाल तर थोडं थांबा, या तारखेपासून करा लागवड कृषी तज्ज्ञांचा इशारा ..

या वर्षीच्या चांगल्या पावसाचा अंदाज ऐकून शेतकरी कापूस पिकाची लागवड करण्याच्या लगबगीत आहेत.परंतु सध्याचे वातावरण लागवडीसाठी योग्य नाही असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या तापमानामुळे शेतात पेरणी करू नका, आता कपाशी पिकाची लागवड केल्यास त्याची उगवण होणार नाही. तळोदा कृषी विभागाच्या वतीने कापसाची लागवड १ जूननंतरच करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

तळोदा तालुक्यात चाळिशी पार तापमान पोहचले आहे. वातावरणातील बदलामुळे कमालीचे तापमान वाढले आहे. अशा उष्ण वातावरणामध्ये कापसाची लागवड केल्यास बियाणे जमिनीत टिकणार नाही. यामुळे कपाशी पिकाची लागवड ही थोडे थंड वातावरण होऊ द्या मगच करण्याचे आवाहन कृषी विभागा द्वारे करण्यात आले आहे .

शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांच्याकडुन बियाणे खरेदीचे पक्के बिल घ्यावे. जर पक्के बिल कृषी सेवा केंद्रचालक देत नसेल तर ते कापूस बियाणे घेऊ नका, तळोदा तालुक्यामधील कृषी सेवा केंद्रचालक कापूस बियाण्याचे पाकीट जास्त दराने विकत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागामध्ये करण्यात यावी . असे देखील आवाहन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारे तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी यांनी केले आहे.

वाढलेल्या तापमानाचा फटका शेती पिकांना बसू शकतो . यामुळे कपाशीची लागवड करू नका. १ जूननंतर किंव काही प्रमाणात वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाल्यानंतर कपाशीची लागवड करण्यात यावी . – मीनाक्षी वळवी, तालुका कृषी अधिकारी, तळोदा

Leave a Reply