सलग तीन वर्ष मिळणार डाळिंब लागवडीसाठी अनुदान , जाणून घ्या सविस्तर

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जॉबकार्ड असणाऱ्या अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, तसेच अनुसुचित जाती जमातीचे शेतकरी ज्याच्याकडे फळबाग लागवडीसाठी दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, असे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत अनुदान पात्र आहेत. शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे मोठा कल आहे. इतर पिकांपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी डाळींबाला प्राधान्य दिले आहे. यातून पारंपारीक पिकांपेक्षा जास्तीचे उत्पन्न घेण्यात यशस्वी झाले आहेत.

असे देण्यात येते अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५० टक्के अनुदान मिळते तर दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तिसऱ्या वर्षी २० टक्के असे तीन वर्षात अनुदान दिले जाते . दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण हे बागायती झाडांसाठी ९० टक्के, तर कोरडवाहू झाडांसाठी ८० टक्के ठेवणे आवश्यक असते . तसेच शेतकऱ्यांने स्वखर्चाने झाडे आणून जीवंत ठेवल्यानंतर सरकारकडून अनदान दिले जाते .

आवश्यक कागदपत्रे..

◼️ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी-
लाभार्थी शेतकऱ्याच्या सातबारा उतारा,
◼️ ८ अ उतारा,
◼️सामायिक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्याने इतर खातेदाराच्या सहमती पत्र सादर करावे लागते.
◼️आधारकार्ड,
◼️बँक खाते नंबर ,
◼️माती परिक्षण अहवाल या कागदपत्रांसोबत अपलोड करावा लागतो.

या फळपिकांचा समावेश..

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत आंबा, कागदी लिंबू, काजू, पेरु, डाळींब, मोसंबी, संत्री, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच. जांभूळ, फणस, अंजिर, चिकू, सिताफळ, आवळा, चिंच. जांभूळ, फणसअशा एकूण १६ फळ पिकांचा समावेश या योजनेमध्ये केला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी आवाहन करण्यात आले आहे कि पारंपारीक पिकांकडे कानाडोळा करुन फळपिकांची जास्तीत जास्त लागवड करावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *