पीक जोमात वाढवा… मालामाल व्हा अन् जिंका भरघोस बक्षिसे, जाणून घ्या शेतकऱ्यांना किती व कसे मिळणार बक्षीस?

खरीप हंगाम सन २०२४ मध्ये कृषी विभागामार्फत सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, उडीद, ज्वारी,सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे . पीक जोमात वाढवा मालामाल व्हा आणि मिळवा भरघोस बक्षिसे अश्या प्रकारे शेतकऱ्यांना कृषी विभागाने आवाहन केले आहे.

दरम्यान, विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते व आणखी नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो .

यामुळे शेतकऱ्यांचे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी योगदान मिळेल. तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळेल व राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होईल , हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे .

कोणत्या पिकांसाठी किती शुल्क?

दरम्यान, ३१ जुलै पर्यंत मूग व उडीद पिकासाठी अर्ज करता येणार आहे ,तसेच सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल ,भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, या पिकांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ३०० रूपये सर्वसाधारण गटासाठी रक्कम व १५० रुपये आदिवासी गटासाठी रक्कम स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क म्हणून राहणार आहे.

स्पर्धेसाठी निकष काय?

स्वतःच्या नावावर शेतकऱ्याकडे जमीन असणे आवश्यक तसेच ती जमीन तो स्वतः कसत असणे स्पर्धेत भाग घेण्यासाठी बंधनकारक आहे. स्पर्धेत एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग घेता येणार आहे . तालुकास्तरावर पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे , तालुकास्तरावरील सर्वसाधारण गटासाठी पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाते .

शेतकऱ्यांना कसे आणि किती मिळणार बक्षीस?

सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय पहिल्या , दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची बक्षीस रक्कम . तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी ५ हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ३ हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार, जिल्हा पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी दहा हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी सात हजार , तिसऱ्या क्रमांकासाठी ५ हजार, राज्य पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी ५० हजार, दुसऱ्या क्रमांकासाठी ४० हजार, तिसऱ्या क्रमांकासाठी ३० हजार अशा प्रकारे पीक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप ठेवण्यात आले आहे.

लागणारे कागदपत्रे..

तालुकास्तरावर ही पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे , तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी सहभाग घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून विजेत्या शेतकयांची निवड करण्यात येणार आहे. अर्जाबरोबर ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, क्षेत्राचा नकाशा ,सातबारा, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास),आणि बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो .

३१ ऑगस्टपर्यंत मुदत ..

मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तसेच उर्वरित पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२४ असून, या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *