महाराष्ट्रात गायीच्या दुध अनुदानासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत वाढली…

गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाची योजना राज्यातील खासगी दूध आणि सहकारी दूध संघ प्रकल्पामार्फत जाहीर करण्यात आली आहे . राज्यातील ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बॅंक खाते, त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी संलग्नित असेल, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर पाच रुपये बॅंक खात्यावर थेट जमा करण्यात येईल .सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी योजनेच्या लाभासाठी ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ या गुणप्रतिसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे किमान दर ३० रुपये प्रतिलिटर सक्तीचे केले आहे. पॉईंट कमी-जास्त होणाऱ्या फॅट व एसएनएफसाठी प्रत्येकी ३० पैसे वजावट किंवा वाढ करून संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर ऑनलाइन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

गाईच्या दूध अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी 30 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांच्याकडे जमा करणे गरजेचे आहे. राज्यातील खाजगी दूध व सहकारी दूध संघ प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय आता 30 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे.

अनुदान योजनेचे लाभार्थी:

◼️ सहकारी दूध संघ
◼️ दूध शितकरण केंद्र
◼️ फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित)
◼️ खाजगी दूध प्रकल्प

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आधारकार्ड ,बँक खाते आणि पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी लिंक असणे डीबीटीसाठी गरजेचे आहे.

दूध संघ किंवा खाजगी प्रकल्पाला दूध उत्पादक शेतकरी हे दूध पुरवठा करणारे असावेत.

शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यासाठी सहकारी संघ आणि खाजगी प्रकल्पांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

दूध भुकटी निर्यातीतून प्रोत्साहनपर अनुदान मिळणार ..

१ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यातील जे प्रकल्प दूध भुकटी निर्यात करतील, त्यांना ३० रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल . तसेच राज्यातील जे सहकारी दूध संघ खासगी प्रकल्प योजना कालवधीमध्ये दूध भुकटी निर्मिती करतील त्यांना दीड रुपये प्रतिलिटर अनुदान देण्यात येणार आहे . त्यामुळे सर्व संघांनी मुदतीमध्ये माहिती भरून पाठवली तर त्यांना हे अनुदान वितरित केले जाईल .

अधिक माहितीसाठी संपर्क:

प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी (officer), अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *