केंद्र सरकारने सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केली. त्यामुळे सोयाबीन दरातही भविष्यात तेजी येईल. सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. डेविश जैन यांनी सांगितले कि यामुळे देशांतर्गंत प्रक्रिया उद्योगांचे पुर्नजीवन होण्यास मदत झाली आहे.
ब्रिलियंट कन्व्हेशन सेंटर इंदूर येथे आयोजित दोन दिवसीय सोयाबीन कार्यशाळे निमित्ताने ते बोलत होते. खाद्यतेलाची आयात चालू हंगामात २२५ लाख टन होईल, अशी अपेक्षा आहे. असे डेविश जैन म्हणाले, खाद्यतेलाचा पुरवठा व मागणी यामध्ये मोठी दरी आहे. त्यामुळे खाद्यतेलाची आयात करावी लागते.
यावर देशाचे मोठे परकीय चलन खर्ची होते. ही बाब लक्षात घेता देशांतर्गंत तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र सरकारने नॅशनल ऑइल मिशनची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या या पावलाचे सोयाबीन प्रोसेसन स्वागत करीत आहे. यामुळे येत्या काळामध्ये देशांतर्गंत लागणाऱ्या ७२ टक्के तेलबियांची गरज भागविणे शक्य होणार आहे.
तेलबियावर्गीय पिकाचे उत्पादनाचे उद्दिष्ट २०३०-३१ या वर्षात ६९७ लाख टन निश्चित करण्यात आले आहे. सध्या ते केवळ ३९० लाख टन इतके कमी आहे. २००० कोटी रुपये भारताला दर वर्षी खाद्यतेलाच्या आयातीवर खर्ची घालावे लागतात. त्यामुळे केंद्राने या क्षेत्रात उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. संजीव आस्थाना म्हणाले, की सोयाबीन बाजारामध्ये सरकारने हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी केली तर दर हमीभावाच्या वर जातील. खरेदीत सरकार मागे पडल्यास पडझडीची शक्यता आहे. तेल उद्योगाला आयात शुल्कामध्ये १० टक्के वाढीची अपेक्षा होती. मात्र सरकारने २० टक्के आयात शुल्क वाढविल्यामुळे तेल उद्योगही हैराण आहे.
यावरही झाले मंथन
🔰रशिया, पोलंड ,युक्रेन या देशांमध्ये सूर्यफुलाचे उत्पादन १५ ते २० लाख टन कमी होईल.
🔰पूर्वी युक्रेन व ३० टक्के , भारत ७० टक्के रशियातून सूर्यफूल तेलाची आयात करीत होता.
🔰युद्धानंतर मात्र युक्रेनकडून ३० टक्के ,रशियाकडून ७० तेल आयात होत आहे.
🔰 सूर्यफूल तेलाची आयात टर्की जगभरातून करून त्यावर प्रक्रिया करीत सूर्यफूल तेल इराणला विकत आहे.
🔰भारतात खाद्यतेलाची आयात नोव्हेंबर महिन्यात वाढेल.
🔰सूर्यफूल तेलाच्या दरात तेजी कायम राहील.
🔰सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय दरामध्ये वाढीची शक्यता.
🔰 दर महिन्याला भारतात १८ लाख टन खाद्यतेलाच्या आयातीची शक्यता.