Maharashtra New CM: राज्यात पंधरावी विधानसभा आली अस्तित्वात, मंगळवारी मंत्रिमंडळ अस्तित्वात

Maharashtra’s New CM decision will possible on today भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly) जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली.

त्यामुळे नवीन विधानसभा म्हणजेच १५वी विधानसभा आता अस्तित्वात आली असून मंगळवारी मागील विधानसभेची मुदत संपणार होती. पण त्याआधीच अधिसूचना देण्यात आल्याने आणि मंगळवारी नवीन मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) शपथ घेणार असल्याने आता राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता मावळली आहे.

दरम्यान काल शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपा आणि महायुतीच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी किंवा अन्य कुणाला मुख्यमंत्रीपद मिळते याकडे राज्याचे लक्ष आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.

सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते.

Leave a Reply