Onion Price : पुणे सांगलीत कांद्याने खाल्ला भाव; नाशिक, सोलापूरमध्ये गडगडला..

Onion Price : शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी राज्यात कांद्याची आवक गुरुवारच्या तुलनेत कमी दिसून आली. नाशिक जिल्ह्यातील बाजारांत लाल कांद्याची ५४ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान बाजारभाव १३०० रुपये कमाल ३७०० रुपये तर सरासरी ३१९९ रुपये असे होते.

सोलापूर जिल्ह्यातील बाजारात लाल कांद्याची ४५ हजार क्विंटल आवक झाली. किमान बाजारभाव ३०० रुपये तर सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले, मागचे दोन दिवसांपासून सोलापूर बाजारात किमान बाजारभाव घसरताना दिसून येत आहेत. तर सरासरी बाजारभाव अडीच हजाराच्या आसपास टिकून असल्याचे दिसतात.

पुणे जिल्ह्यातील बाजारांत आज दुपारपर्यंत एकूण १८ हजार क्विंटल आवक झाली. किमान बाजारभाव २२५० रुपये तर सरासरी बाजारभाव ३६७५ रुपये प्रति क्विंटल होते.

दरम्यान लासलगावच्या उपबाजार-विंचूर येथे आज सुमारे साडेतीन हजार क्विंटल लाल कांदा आवक होऊन किमान बाजारभाव २ हजार, तर सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल इतके मिळत आहेत. पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची १६ हजार ५०० क्विंटल आवक झाली. किमान बाजारभाव १ हजार रुपये, तर सरासरी ३२५० रुपये प्रति क्विंटल असा होता. चांदवड बाजारात लाल कांद्याची सुमारे १२ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान बाजारभाव १ हजार तर सरासरी बाजारभाव ३ हजार रुपये प्रति क्विंटल असा होता.

कोल्हापूरला कांद्याची सुमारे ५ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी २४०० रुपये आणि किमान १ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सांगली बाजारात ५ हजार क्विंटल कांदा आवक होऊन सरासरी ३७५० रुपये बाजारभाव लाल कांद्याला मिळाला. पुणे बाजारसमितीत १७ हजार क्विंटल लोकल जातीचा कांदा आवक होऊन कमीत कमी २ हजार आणि सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

Leave a Reply