Maharshta Weather Update : थंडीने द्राक्षासह फळबागांचे नुकसान; मात्र पुढच्या आठवड्यात मिळणार दिलासा..

Maharshta Weather Update : या संपूर्ण आठवड्यात राज्यातील सर्वच भागांना थंडीचा तडाखा बसला आहे. मंगळवारी नाशिकमधील निफाडचे तापमान हे नीचांकी म्हणजेच ५.६ अंश पर्यंत घसरले होते. अशा स्थितीत राज्यातील हवामान आणि थंडी कशी असेल, पाऊस पडेल का? याबाबत जाणून घेऊ

मध्य भारतात समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत आता छत्तीसगडमधील भिलाईच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळकाटा दिशेने प्रत्यावर्ती (घुसळल्यासारखे मध्य बिंदूपासून बाहेर फेकणारे) चक्रीय थंड वाऱ्यांच्या परिणामातून  उत्तर भारतातील थंडीचा ओघ महाराष्ट्राकडे असुन महाराष्ट्रात थंडीची लाट तर काही ठिकाणी थंडीच्या लाट सदृश्य स्थिती कायम आहे.

मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता महाराष्ट्रात  निरीक्षण केलेल्या उपकरणीय नोंदीनुसार  थंडीची लाट किंवा थंडीच्या लाट सदृश्य स्थिती जाणवणाऱ्या महाराष्ट्रातील काही ठिकाणांचे पहाटे साडेपाच चे किमान तापमान डिग्री सेन्टीग्रेड मध्ये खालील प्रमाणे आहे.( कंसातील अंक सरासरीपेक्षा झालेली घसरण दाखवते आहे.)

अलिबाग १३.७(-४. ८), रत्नागिरी १५…३(-४. १), डहाणू १४. ९(-३. ६), मुंबई सांताक्रूझ १५ (-३),  अहिल्यानगर ५.६(-४.५), नाशिक ८(-३.५), पुणे ८(-३), सातारा ९…१(-३. ३), नांदेड ८.६(-४)परभणी ९.४(-३.२), धाराशिव १०. २(-३),  नागपूर ८. २(३.८), वर्धा ९.५(-३.३)

सध्या महाराष्ट्रात भागानुसार कमी अधिक प्रमाणात जाणवत असलेली अपेक्षित थंडी ही बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी) पर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे.

गुरुवार दि. १९ डिसेंबर पासून पुढील १० दिवस मात्र महाराष्ट्रात कमाल व किमान अशा दोन्हीही तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून सध्या जाणवत असलेल्या थंडीपेक्षा महाराष्ट्रात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी  जाणवणार नाही, असे वाटते. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे रविवार दि. २९ डिसेंबर पासून  हळूहळू थंडीत वाढ होवून नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा आहे. मात्र येत्या नजीकच्या काळात  कोणत्याही वातावरणीय घडामोडीतून महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे सेवानिवृत्त तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.10:59 AM

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *