Tur production : खादगावच्या शेतकऱ्यांनी पेरली भरघोस उत्पादन देणारी तूर…

Tur production : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील मौजे खादगाव येथे एकाच ठिकाणी जवळपास ७०० एकर प्रक्षेत्रावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित तुरीच्या गोदावरी या वाणाची पेरणी केलेली

खादगाव येथे यापूर्वी विद्यापीठाने विकसित केलेली बीडीएन ७११ या वाणाची जवळपास १००० एकरवर पेरणी केली जात असे. आता याच ठिकाणी गोदावरी वाणाची पेरणी केली जात आहे. या वाणाच्या शेंगांमध्ये चार ते पाच दाणे असून मर रोगास बळी पडत नाही.

गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळते. तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे आंतरपीक घेवून सोयाबीनचे ७ ते ८ क्विंटल उत्पादन घेतल्याचे शेतकरी सांगतात.

दरम्यान या तुर लागवडीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी भेट देऊन कौतुक केले. यावेळी खादगाव येथील शेतकऱ्यांशी डॉ इन्द्र मणि यांनी संवाद साधला. याबरोबरच शेतकऱ्यांना तुरीच्या विक्री व्यवस्थापन आणि प्रक्रियाबद्दल मार्गदर्शन केले. भविष्यात डाळीची आयात बंद करण्यासाठी तुरीचा गोदावरी हा वाण नक्कीच लाभदायक ठरेल अशी आशा यावेळी कुलगुरू यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *