
kanda bajarbhav: सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी पुण्यात सकाळच्या सत्रात ६ हजार ४०० क्विंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी १४०० तर सरासरी २१०० रुपये असे आहेत.
पिंपरी बाजारात सरासरी १७५० रुपये बाजारभाव मिळाला, तर नगर जिल्ह्यातील कर्जत बाजारात १५०० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात सोमवारी लासलगाव बाजारात कांद्याचे दर टिकू होते. मागील सोमवारी लासलगावला लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले होते. मात्र त्यानंतर आवक वाढली आणि शनिवारपर्यंत दररोज या दरात सरासरी १ ते २ रुपयांची टप्पया टप्प्याने घसरण होऊन आठवड्याच्या शेवटी हेच दर १८५० रुपये प्रति क्विंटल आले.
या आठवड्यात रविवारी म्हणजे १२ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात ५६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. मागच्या रविवारी हीच आवक दुप्पट म्हणजेच सुमारे १ लाख २५ हजार इतकी होती. याशिवाय देशातील रविवारची आवकही मागच्या रविवारच्या तुलनेत कमी असून या रविवारी देशभरात केवळ ८ हजार टन आवक झाली आहे.
सोलापूरला सुटी
श्री सिद्धेश्वर यात्रेमुळे सोलापूरला रविवार दिनांक १२ तारखेपासून सुरुवात झाली असून पुढील चार दिवस यात्रा सुरू असल्याने सुटी असणार आहे. त्यामुळे सोलापूरचे कांदा लिलाव आता गुरुवारी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गुरूवारपर्यंत तरी सुमारे ४० हजार सरासरी दररोज कांदा आवक कमी होण्याची शक्यता असून या काळात बाजारभाव स्थिर राहू शकतात किंवा काही ठिकाणी वाढू शकतात, असा अंदाज आहे.