
Ladki Bahin Yojna : नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला असं म्हटलं जातं महायुतीला राज्यामध्ये 288 पैकी 235 जागा जिंकता आल्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पदरामध्ये फक्त 47 जागा पडल्या आता या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या प्रचंड यशामागचं कारण आहे राज्यातील सर्व महिला असं खाजगी मध्ये सांगितलं जातं कारण विधानसभा निवडणुकांच्या आधी जुलै महिन्याच्या अर्थसंकल्पात राज्य तील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली गेली ती घोषणा केली होती माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदेंनी केलेल्या घोषणेप्रमाणे सप्टेंबर महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये सरकारकडून पाठवले जाऊ लागले आणि राज्यातील लाडक्या बहिणीच्या संसाराला सरकारच्या याच ओवाळणीचा चांगला हातभार लागला आणि याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते.
एकीकडे महायुतीने बहिणींच्या संसाराला हातभार लावला आणि दुसरीकडे बहिणी यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये बसून रिटर्न गिफ्ट दिलं निवडणुकी आधी फॉर्म भरलेल्या सरसकट सर्व महिला यांना या योजनेचा लाभ दिला गेला पण आता याच लाडक्या बहिणींच्या अर्जाची छानणी करण्याची तयारी सरकारने केलेली आहे या छानणी मधून किमान 60 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होऊ शकतात असा एक अंदाज आहे आता प्रश्न असा आहे की ज्या बहिणींनी प्रचंड मताधिक्यानं या महायुतीला सत्तेमध्ये आणलं त्याच लाडक्या बहिणी महायुतीला आता आता नकोशा झाल्यात का किंवा महायुतीला लाडक्या बहिणींची संख्या योजनेतून नक्की का कमी करायची आहे आता या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत .
विधानसभा निवडणुकी आधी जुलै महिन्यामध्ये महायुतीनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील दोन कोटीहून अधिक महिला घेत आहेत असं सांगण्यात येतं मध्यप्रदेश मध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपच्या शिवराज सिंह चव्हाण यांनी ती इथे विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा झाला होता. मध्यप्रदेशातील हीच लाडकी बहीण योजना भाजपने महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी परत एकदा आणली आणि माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीला राज्यामध्ये पुन्हा सत्ता स्थापन करता आली पण गरज सर्व वैद्य मरो या म्हणीप्रमाणे महायुती सध्याच्या घडीला वागत आहे असं सध्या राज्यातील महिला म्हणताना दिसून येत आहेत कारण की या लाडक्या बहिणींच्या जीवावरती महायुती सत्तेमध्ये परत एकदा आली पण याच लाडक्या बहिणींना योजनेतून कमी करायचं असं स्वतः महायुतीतले नेते म्हणताना दिसतायत . माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबेळ यांचं स्टेटमेंट सध्या व्हायरल होताना दिसतंय ते असं म्हणालेत की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फायदा काही प्रमाणात नको त्यांना झालेला आहे .
मात्र यावेळी नियम काही वेगळे आहेत योजनेचा आर्थिक लाभ एका घरात दोन महिलांना देता येत नाही . ज्यांच्याकडे मोटर गाडी असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही गरिबांना याचा लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे . जे नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपलं नाव काढलं पाहिजे. जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यामध्ये काही अर्थ नाही ते आता मागण्यात येऊ नयेत मागे जे झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण . मात्र याच्यापुढे लोकांना सांगावं ज्या बहिणी नियमामध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावीत अन्यथा सरकारनं दंडासह वसुली करावी असं छगन भुजबळ यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे बघा विधानसभा निवडणुका व्हायच्या आधी महायुतीमधील नेते लाडकी बहीण योजनेची रक्कम ₹1500 रुपया वरून ₹2100 रुपये करणार असं महिलांना म्हणाले होते. आणि आता याच महायुतीमधील नेत्यांना बरोबर निवडणुका झाल्यानंतर योजनेमधील नियमांची आठवण होऊ लागलेली आहे. असं सर्वजण म्हणताना दिसतायत. बरं अर्जांची पुर्नपडताळणी करून काही महिलांचे अर्ज योजनेतून कमी करणार असं फक्त महायुतीतील एकटे छगन भुजबळच म्हणतायेत असं नाहीये तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर जी पहिली पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींच्या योजनांच्या अर्जांची छानणी निकषाप्रमाणे होईल आणि नंतरच लाभ दिला जाईल असं स्पष्ट केलेलं होतं
यासोबतच आदिती तटकरे ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजनेतील अर्जांबाबत काही तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी निकषांप्रमाणे केली जाणार आहे पण हे करत असताना कुठेही मूळ जीआर मध्ये बदल होणार नसल्याचं आदिती तटकरे यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. आता नेमक्या कोणत्या अर्जांची पुनर्पडताळणी होणार हे तुम्हाला सांगतो तर ज्या महिलांचं किंवा त्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांच्या अर्जांची छानणी केली जाणार आहे ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत
त्यांच्या घरी जर का चार चाकी वाहन असेल तर त्यांच्या सुद्धा अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. एकाच महिलेने जर का दोन अर्ज दाखल केलेले असतील तर त्यांच्या सुद्धा अर्जांची छानणी केली जाणार आहे. लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या ज्या महिला आहेत पण तरी सुद्धा इथे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल आणि लाभ घेत असतील तर त्यांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे. आधार कार्ड वरती आणि इतर कागदपत्रांवरील नावामध्ये जर का तफावत असेल तर त्याची सुद्धा पडताळणी होणार आहे आणि या योजनेचा लाभ घेणारी महिला जर का इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर त्या सुद्धा अर्जांची ची पडताळणी होणार आहे आता परत एकदा एक गोष्ट क्लिअर करतो सुरुवातीच्या जीआर मध्ये जे निकष होते त्या निकषानुसार अर्ज प्राप्त झालेले आहेत का हेच फक्त चेक केलं जाणार आहे.
निकषामध्ये बसत नाही येत आणि तरीसुद्धा जर का अर्ज केलेला असेल आणि या योजनेचा लाभ घेतलेला असेल त्यांनीच फक्त टेन्शन घेण्याचं कारण आहे. आता या अर्जांची परत एकदा पडताळणी करायला शासनाला विधानसभाच्या निवडणुका झाल्यानंतरच आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जाग कशी काय आली? असा सवाल सुद्धा विचारला जातोय सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी जानेवारी 2025 पर्यंत शासनाने केलीच नव्हती का काय ? अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली दिसून येते विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आधी शासनाने सरसकट सर्वच महिलांचे अर्ज मान्य केले आणि आता निवडणुका झाल्यानंतर शासनाला अचानकच अर्जांची पुनर्पडताळणी करायची आहे ज्या वेळेस ही योजना सुरू झाली होती त्यावेळेस निकष काही जरी असले तरीसुद्धा फक्त महिला आहे.
या एकाच निकषावरती सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ दिला गेला होता आणि त्याच्यामुळे आता या अर्जांची परत एकदा छानणी करण्याची वेळ सरकार वरती आलेली आहे. शासनाने लाडके बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या अर्जांची जर का पडताळणी करायचं ठरवलं तर खूप साऱ्या महिलांचे अर्ज या योजनेतून बाद होऊ शकतात. कारण की ज्या महिलांनी निकषामध्ये दिसत नसताना सुद्धा जर का लाभ घेतलेला असेल तर तो इतरांवरती अन्याय केल्यासारखा आहे. यासोबतच जर का त्या महिलांचे अर्ज बाद झाले तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना मिळणारा हप्ता जो आहे तो मिळणार नाही असं सुद्धा म्हटलं जातंय . बर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्याची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली आहे. पुणे पिंपरी चिंचवड यासोबतच राज्यातील काही भागांमध्ये दहा हजाराहून अधिक अर्ज बाद केल्याचं सुद्धा सांगितलं जातंय. महायुतीनं फक्त निवडणुकांपुरतं लाडक्या बहिणींचा वापर केला की काय आणि निवडणुका झाल्या तर आता या लाडक्या बहिणींची गरज नाही
त्यांना डचू दिला जाणार की काय असं सुद्धा सध्या विरोधी पक्षाचे नेते म्हणताना दिसून येत आहेत मुख्य प्रश्न आता असा आहे की नियमांमध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींचे अर्ज जे बाद होणार आहे. त्याच्यासाठी नक्कीच जबाबदार आहे तरी कोण ? एक म्हणजे ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते महायुती सरकार जबाबदार आहे की स्वतः निकषामध्ये बसत नसताना सुद्धा अर्ज भरणाऱ्या या लाडक्या बहिणी जबाबदार आहेत कारण योजनेची अंमलबजावणी करताना आलेल्या अर्जांची पडताळणी करणं हे शासन आणि शासकीय यंत्रणा यांचं कर्तव्य आहे. त्यांची जबाबदारी आहे पण निवडणुकांच्या आधी योग्य रित्या महिलांच्या अर्जांची त्यांनी छानणी न केल्यामुळे आता ज्या महिलांनी गेले सहा महिने किंवा सहा हप्त्यांसाठी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. ज्यांना या योजनेची आता सवय लागलेली आहे.
त्यांना मात्र आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या हप्त्यांना मुकावं लागणार असं दिसून येतंय आता लाडक्या बहिणी जरी सरकार वरती टीका करत असल्या की सरकारने अगोदर हे केलं नाही निवडणुकांच्या आधी त्यांना लक्षात आलं नाही तरीसुद्धा एक गट असं सुद्धा म्हणताना दिसतोय की हे सर्व होण्यासाठी निकषामध्ये न बसणाऱ्या पण तरीसुद्धा अर्ज केलेल्या लाडक्या बहिणी सुद्धा तितक्याच जबाबदार आहेत . लाडक्या बहिणीच्या योजनेची नियमावली शासनाने आधीच जाहीर केली होती. आता शासनाने अपेक्षा काय केली की प्रत्येक जण ज्याचं त्याचं जी सत्स विवेक बुद्धी आहे. त्याच्यानुसार अर्ज करेल पण तसं काही झालेलं नाही मिळतायत पैसे तर कुणीही सुट्टी दिलेले नाहीये. खाजगी मध्ये असं सुद्धा म्हणताना दिसत होते की कुणीच जर का सोडत नाहीये तर आपण का हे एवढे पैसे सोडायचे इतर काही असो पण ही योजनेचे पैसे सोडायचे नाही . असं सुद्धा काही जण म्हणताना दिसून येते . आता अजून एक गट असा म्हणताना दिसतोय की नेमकी अशी योजना आणण्याचं कारणच काय महाराष्ट्र हे देशातलं प्रगतिशील असं राज्य आहे . देशातील क्रमांक एक च राज्य आहे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे . देशामध्ये सर्वाधिक शहरीकरण सुद्धा महाराष्ट्रामध्येच झालेला आहे. मग तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये ही अशी योजना का आणली गेली ? तर या योजनेचे फायदे आणि तोटे दोन्ही समजून घेणे गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासोबतच इंटरनेट याच्यामुळे नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत मग नोकऱ्या कमी झालेल्या असताना अशा योजनेतून जगण्यासाठी पुरेस उत्पन्न मिळण्यासाठी निश्चितपणे मदत होऊ शकते असं शासनाचे एकंदरीत धोरण होतं उत्पन्नाची सुरक्षितता वाढू शकते.
त्याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होऊ शकतो पण हे कोणासाठी तर ज्यांना जगण्याची भ्रांत आहे . त्यांच्यासाठी जो नाही रे वर्ग आहे. त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित गटासाठी किमान प्राप्त झाल्यास किती उत्पादन मिळते? त्याच्यामुळे गरिबी आणि उत्पन्नामध्ये जी असमानता आहे पॉवर्टी मध्ये व्ही ज्यावेळेस दाखवतात म्हणजे तर तो व्ही पी ओ व्ही हा जो आहे व्ही मोठा दाखवतात ही दरी जी आहे व्ही मधली ही दिवसेंदिवस वाढत असताना या अशा योजनेमुळे ही असमानता कमी होण्यास निश्चितपणे मदत होऊ शकते असं शासनाचे धोरण होतं.
हे जे सहाय्य केलं जाते शासनाकडून त्याच्यामुळे लोकांना अन्न आरोग्य शिक्षण आणि घर यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या कामे निश्चितपणे मदत होऊ शकते असं शासनाला वाटत होतं पण झालंय काय तर या योजनेचा लाभ जो आहेरे वर्ग आहे त्यांनीच घेतलेला आहे असं दिसून आलेला आहे आणि म्हणून आता या अर्जांची छानणी करण्याची वेळ सरकार वरती आलेली आहे शेवटी काय तर लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका मध्ये महायुती सरकार तर खरं पण महायुती सरकारनंच आता लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करून महिलांना फसवलंय आणि महायुतीला आता या लाडक्या बहिणींचा विसर पडलाय असं सुद्धा महिला म्हणताना दिसून येत आहेत
तुम्हाला काय वाटतं की महायुतीने फक्त निवडणुकांपुरतंच या बहिणींना योजनेचे पैसे दिले किंवा महायुतीला आता या लाडक्या बहिणी नको झाल्यात की काय या प्रश्नांची उत्तर तुम्ही नक्की सांगा तोपर्यंत आमचे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद