Cultivation of onion : यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचा किती पेरा झाला ?

Cultivation of onion : नुकतीच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत देशातील रब्बी लागवड क्षेत्रासह कांदा, बटाटा आणि टोमॅटो लागवडीचाही आढावा घेण्यात आला. 17 जानेवारी 2025 रोजी एकूण पेरणी क्षेत्र 640 लाख हेक्टर आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 637.49 लाख हेक्टर होते त्या तुलनेत हे क्षेत्र 2.51 लाख हेक्टरने अधिक आहे.

एकूण पीक व्याप्ती आणि पीक स्थिती मागील वर्षापेक्षा चांगली आहे. रब्बी मधील टोमॅटो, कांदा आणि बटाटा (TOP) ची पेरणी सुरू आहे आणि आजपर्यंत चालू वर्षी TOP पिकांची पेरणी मागील वर्षाच्या याच कालावधीपेक्षा अधिक आहे.

सध्या बाजारात गहू, तांदूळ, हरभरा, मोहरी आणि तीळ यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) अधिक भाव मिळत आहे.

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कृषी विषयक मुद्द्यांबाबत आढावा बैठक घेतली. रब्बी पेरणीची प्रगती, हवामान परिस्थिती, राष्ट्रीय कीटक देखरेख प्रणाली (NPSS) द्वारे कीटकांचे निरीक्षण, कृषी उत्पादनांचे विपणन, उत्पादनांच्या आयात आणि निर्यातीसह अनेक मुद्द्यांवर आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.

शेतीच्या प्रश्नांवर साप्ताहिक बैठका घेण्याव्यतिरिक्त, वेळोवेळी राज्य सरकारांसोबत कृषी मंत्र्यांच्या पातळीवर बैठका देखील आपण घेणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी सांगितले. या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनीही राज्य सरकारांशी सातत्याने संवाद साधावा जेणेकरून स्थानिक समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचा सहभाग व्यापक केला जाऊ शकेल असे ते म्हणाले.

Leave a Reply