Jaggery Market Rates:संक्रांतीनंतर गुळ वधारला की घसरला; असे आहेत बाजारभाव..

Jaggery Market Rates

Jaggery Market Rates : मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी सांगलीच्या बाजारात स्थानिक प्रकारच्या गुळाची सुमारे ११०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३२५०, जास्तीत जास्त ३८७१ आणि सरासरी ३५६१ प्रति क्विंटल बाजारभाव होते.

संक्रांतीनंतर गुळाच्या बाजारात थोडीशी घसरण पाहायला मिळाली. मात्र मुंबई बाजारात गुळाला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. मुंबईला काल सुमारे साडेचारशे क्विंटल गुळाची आवक झाली. कमीत कमी ५२०० रुपये, जास्तीत जास्त ६ हजार २०० रुपये आणि सरासरी ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गुळाला मिळताना दिसत आहेत.

दरम्यान पुणे बाजारात एक नंबर गुळाला ३७५० रुपये प्रति क्विंटल, २ नंबर गुळाला ३५६५ रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. बारामती बाजारात एक नंबर गुळाला ३८३१, तर दोन नंबर गुळाला ३५०० रुपये बाजारभाव मिळाला. जालन्यात तांबूस गुळाला सरासरी २९२९ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सोलापूरमध्ये पिवळ्या गुळाला सरासरी ३७०० रुपये बाजारभाव मिळाला.

Leave a Reply