Soyabean Market Price:आठवड्याच्या शेवटी सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहेत?

Soybean Market prices

Soyabean Market Price : मागील संपूर्ण आठवडाभर सोयाबीन साधारणत: ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विक्री होताना दिसून आले. लातूर बाजारात साधारणत: ४१०० आसपास सोयाबीनचे दर स्थिर राहिले. आठवडा संपत आलेला असताना सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे.

आज शनिवार दिनांक २५ जानेवारी २५ रोजी भोकरदन बाजारात पिवळ्या सोयाबीनची १०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर ३९०० आणि सरासरी ४ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

दरम्यान शुक्रवारी अमरावती बाजारात लोकल वाणाच्या सोयाबीनची १० हजार ६११ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३८५०, जास्तीत जास्त ४ हजार ७१ आणि सरासरी ३९६० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

अकोला बाजारात सोयाबीनची ४३८३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी दर ३५०० रुपये आणि सरासरी ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटलसाठी मिळाला.

हिंगणघाट बाजारात सरासरी ३६०० रुपये आणि कमीत कमी २७१० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वाशिम बाजारात सरासरी ४१५० असा दर होता.

हिंगोलीला सरासरी ३९५० रुपये प्रति क्विंटल, जिंतूरला ४ हजार रुपये सरासरी, बीडला ४ हजार रुपये सरासरी, सेलूला ४१०० रुपये, निलंग्याला ४ हजार रुपये सरासरी प्रति क्विंटल दर मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *