
Flower production : मोहाच्या फुलांचा हंगाम सुरू झाला असून हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता या फुलांपासून पौष्टिक लाडू तयार करण्याकडे वळले आहे. त्यासंदर्भात नुकतेच येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणही घेण्यात आले.
मोहाच्या फुलापासून आयुर्वेदिक औषधीयुक्त लाडू बनवण्याची प्रक्रिया आणि त्याचे प्रशिक्षण काल उमरदरा वाडी तालुका, कळमनुरी येथे घेण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी श्री महादजी शिरोडकर , सौ रोहिणी शिंदे यांनी पुढाकार घेतला त्यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी.पी. शेळके त्याचप्रमाणे विस्तार विभागाचे डॉ. अतुल मुरई हे सुद्धा उपस्थित होते.
गावातील अनेक महिला आणि शेतकरी यांनी लाडू बनवण्याच्या या प्रक्रियेत सहभाग नोंदविला आणि प्रत्यक्ष लाडू बनवून त्याचे पॅकिंग पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वतः करून बघितले.
हा उद्योग ज्या ठिकाणी मोह फुलांची उपलब्धता आहे आणि गावांमध्ये इतर कुठलाही व्यवसाय उपलब्ध नाही अशा गावांमध्ये करता येण्यासारखा आहे.
दरम्यान ज्यांना या संदर्भात प्रशिक्षण आणि अधिक माहिती ही आहे त्यांनी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, जि. हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन डॉ.पी.पी. शेळके यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे कोणाला लाडू पाहिजे असल्यास त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.