St bus:आजपासून ग्रामीण भागातील आवडत्या एसटीची झाली भाडेवाढ; इतकी बसणार झळ

Bus St Ticket

St bus : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ आजपासून दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून लागू झाली आहे. एकूण १५ टक्के भाडेवाढ झाली आहे.

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

अशी झाली आहे भाडेवाढ:

सेवेचा प्रकार : साधी बस:
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) :
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

निम आराम :
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान :
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर(वातानुकूलीत):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये,

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत):
सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *