kanda market : कांदा वाढला की घसरला, कसा मिळतोय बाजारभाव…

kanda market today: आज शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी पुणे- पिंपरी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी १ हजार अणि जास्तीत जास्त २२०० रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी १६०० रुपये बाजारभाव मिळाला. कालच्या तुलनेत आवक कमी असूनही बाजारभाव पडलेले पाहायला मिळाले. काल पिंपरी बाजारात सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल दर होते.

दरम्यान सोमवारपासून आजपर्यंत म्हणजेच संपूर्ण आठवडाभर राज्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. तर काही ठिकाणी थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत.

काल शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी लासलगाव बाजारात लाल कांद्याची सुमारे २५ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ११०० रुपये आणि सरासरी २४०० रुपये तर जास्तीत जास्त २९०० रुपये बाजारभाव मिळाला.

सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळाला. कमीत कमी २०० रुपये बाजारभाव मिळाला. या ठिकाणी सुमारे २९ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याची सुमारे १९ हजार क्विंटल आवक झाली आणि सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *