
mulberry garden:भारत देशात 6 ते 7 प्रकारचे कोळी किटकांचा तुती बागेवर प्रादूर्भाव होतो, त्यात टेट्रानायचस इक्विटो रोस व टेट्रानायचस लूडिनी हृया होत. कुन्नूर तमिळनाडू येथे प्रथम इयूटेट्रानायचस अरीयंटलीस या कोळी किटकाचा तुती बागेवर प्रादुर्भाव दिसून आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
पिवळे ब्रॉड माइट या बहुभक्षी कोळी किटकाचा पॉली फॅगोटेट्रानिमस लॅटस कुन्नूर तमीळनाडू येथे तुती बागेत प्रादूर्भाव आढळुन प्रथम हा दुर्मीळ प्रादूर्भाव करणारा कोळी किटक मोठ्या प्रमाणावर तुती बागेवर प्रादूर्भाव करत आहे.
सन 2019-20 मध्ये कर्नाटक व तमिळनाडू राज्यातील तुती बागेचे नुकसान करत असून सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्यातील तुती बागेत दिसून आला आहे.
तुतीची नविन वाढ जळाल्यासारखे पिवळे पडताव व वाळतात. बागेवर 80 टक्के गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी नंतर 5 दिवसांनी तुती पाने खाऊ खालावेत.