
kanda market today: रविवारच्या सुटीनंतर सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर राज्यात कांद्याची एकूण २ लाख ७३ हजार क्विंटल आवक झालेली दिसून आली. मागच्या सोमवारच्या तुलनेत ही आवक कमी होती. त्यामुळे आज मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारभाव टिकून राहिले आहे. लासलगावला ते वाढलेले असून काही ठिकाणी किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे.
लासलगाव बाजारात आज सकाळच्या सत्रात सुमारे साडे तेरा हजार क्विंटल कांदा आवक झाली. कालच्या पेक्षा आज येथे भाव वधारलेले दिसून आले. कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त २८८२ आणि सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल भाव होते.
दरम्यान आज नाशिकच्या पिंपळगाव-सायखेडा बाजारात लाल कांद्याचला कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त २४०० आणि सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.
पुणे बाजारात सकाळी सुमारे १६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. कमीत कमी बाजारभाव १५०० रुपये, जास्तीत जास्त २८०० रुपये आणि सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटल दिसून आले. कालच्या तुलनेत आज येथे आवक कमी असून बाजारभाव किलोमागे ५० पैशांनी घसरले आहेत.
दरम्यान खेड चाकण बाजारात कांद्याला चांगले दाम मिळत आहेत. येथे ६०० क्विंटल आवक होऊन किमान २ हजार, जास्तीत जास्त ३ हजार आणि सरासरी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव आहेत. सांगली बाजारात सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर कामठी बाजारात सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहेत.