
soybean bajarbhav : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाची किंमती पाम तेलाच्या तुलनेत कमी झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या अहवालानुसार सध्या पामतेलाला 1035.11 डॉलर प्रति टन तर सोयाबीनच्या तेलाला 981 डॉलर प्रति टन असे दर मिळत आहे. दरम्यान स्वस्त असलेले पामतेल महाग झाल्याने व्यापारी आणि ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली असून देशात सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. इतकेच नव्हे, तरी पामतेलाची भारतातील आयातही घटली आहे. मागील अनेक महिन्यांपासून पामतेल सोयाबीन तेलापेक्षा महाग असल्याचे दिसून येत आहे.
भारतात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेलाची आयात होते, तर अर्जेंटिना, ब्राझीलमधून सोयाबीन तेल आणि रशिया, युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आयात होते.
सुमारे वर्षाभराच्या कालावधीत पाम तेलाच्या दरात सरासरी २८ ते २९ टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळेस सोयाबनीच्या तेलाचे दर मात्र सरासरी ८ ते ९ टक्क्यांनी घसरले आहे. हेच कारण आहे की यंदाच्या हंगामात सोयाबीनला बाजारभाव तुलनेने कमीच राहिले. असे असले तरी ही स्थिती अशीच राहिली, तर सोयाबीनच्या बाजारभावावर त्याचा थोडासा फरक पडू शकतो. सध्या लातूर बाजारात सोयाबीन ४ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी विक्री होताना दिसत आहे. तर अनेक ठिकाणी त्यात मागील आठवड्याच्या तुलनेत किलोमागे १ ते २ रुपयांची वाढ झालेली आहे.
दरम्यान एका अहवालानुसार जानेवारीमध्ये पाम तेलाची आयात मागील महिन्याच्या तुलनेत 46 टक्क्यांनी घसरून 2 लाख 72 हजार मेट्रिक टन झाली आहे, जी मार्च 2011 नंतरची सर्वात कमी आयात समजली जाते. ऑक्टोबर 2024 मध्ये संपलेल्या आर्थिक खरेदी वर्षात भारताने दरमहा सरासरी 7 लाख 50 हजार टन पाम तेल आयात केले, तर दुसरीकडे जानेवारीमध्ये सोया तेलाची आयात एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढून 4 लाख 38 हजार मेट्रिक टन झाली, जी सात महिन्यांतील सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते.