maize market price : मका बाजारभाव वाढणार की घटणार? मार्चपर्यंत कसे राहतील भाव..

maize market price: मका हे आंतराष्ट्रीय स्तरावरील महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. अमेरिका, चीन, ब्राझील, अर्जेंटिना आणि भारत या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतात मका खरीप, रब्बी आणि उन्हाळी अश्या तिन्ही हंगामात घेतली जाते. प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश आदी राज्यांचा समावेश होतो. भारतात मक्याचा वापर हा मुख्यतः पोल्ट्री खाद्य, पशुखाद्य यासाठी केला जातो. या भारतात मक्याची मागणी, पुरवठा व उपभोग या घटकांमध्ये होणाऱ्या बदलाचा मक्याच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२४-२५ मध्ये, जगात मागील वर्षांच्या तुलनेत ०.६ टक्के मक्याचे उत्पादन घट होण्याच्या अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात २०२४-२५ मध्ये ६ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, जी २०२३-२४ च्या तुलनेत २५% घट होईल असा अंदाज आहे.

देशांतर्गत किंमती वाढल्यामुळे आणि पिक कमी झाल्यामुळे २०२३-२४ या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षाच्या निचांकी पातळीवर घसरली. इथेनॉल, कुक्कुटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळेही निर्यातीत घट झाली.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, भारतात मागील वर्षांच्या तुलनेत १.५ टक्के मक्याचे उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मक्याचे उत्पादनात ०.९० टक्के वाढ होण्याचा असा अंदाज आहे. केंद्र सरकारने दि. २६ जून २०२४ रोजी एकुण ५ लाख टन मका आयातीची अधिसूचना जाहीर केली आहे.

देशात चालू वर्षीच्या डिसेंबर २०२४ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या डिसेंबर २०२३ च्या तुलनेत ६९.३७ टक्क्यांनी वाढली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १३.८७ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

मार्चपर्यंत कसा असेल बाजारभाव?
मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या जानेवारी ते मार्च महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे आहे.
फेब्रुवारी २०२२ रुपये १८६१ प्रति क्विंटल
फेब्रुवारी २०२३ रुपये २०९५ प्रति क्विटल
फेब्रुवारी २०२४ रुपये २१५१ प्रति क्विंटल

खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची आधारभूत किंमत (MSP) रु. २२२५ प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमत अंदाज पुढील प्रमाणे : रुपये २२५० ते २४५० प्रति क्विंटल.

Leave a Reply