cotton market prices: मार्चपर्यंत कापसाचे बाजारभाव कसे राहतील? जाणून घ्या..

Cotton prices

cotton market prices:अजूनही काही शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे. त्यांच्यासाठी फेब्रुवारीचा संपूर्ण महिना ते मार्चपर्यंत कापसाचे बाजारभाव काय राहतील हे जाणून घेऊ यात. कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे ‘व्हाइट-गोल्ड’ म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५% वाटा भारताचा आहे.

राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयात व निर्यातीमध्ये सरासरी ६% वाढ झाली आहे.

USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पादन २५.४ दशलक्ष ४८० Ib bales आहे., शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी, मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षेमुळे पेरणी केलेल्या १२.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. (Source: USDA -Cotton Outlook) (स्रोत: USDA-Cotton Outlook) महिन्यातील बाजारातील कापसाची आवक गतवर्षी पेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.

मार्चपर्यंत अशा राहतील किंमती
२०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारला असूनही २०२४-२५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. बाजारपेठेत मध्यम धाग्याच्या कापसाचे भाव किमान आधारभूत किमत (रु. ७,१२१/- पेक्षा जास्त आहेत. मार्च २०२५पर्यंत कापसाच्या किमती अंदाजे रु. ७,००० ते ७,७०० प्रति क्विंटल राहतील असा अंदाज बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम निवारण कक्षातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply