प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अं.से. ने जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) दिनांक 07 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाऊस सरासीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने ऊस आणि हळद पिकांसाठी पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.
ऊसाचे व्यवस्थापन:
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रुवारी पर्यंत करता येते.
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद व्यवस्थापन:
हळद पिकाची काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.












