PM Kisan: प्रतिक्षा संपली; या तारखेला मिळणार पीएम किसानचा १९ वा हप्ता..

PM Kisan: पीएम किसानचा १८ वा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना आता पुढच्या हप्त्याची उत्सुकता आहे. मात्र लवकरच पीएम किसान पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण पीएम किसानचा १९वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो.

यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह यांनी अलिकडेच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १९ वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. पंतप्रधान या तारखेला बिहारच्या दौऱ्यावर असून तेथील एका कार्यक्रमातून सार्वजनिकरित्या पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसानचा पुढचा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना पाठवला जाऊ शकतो. दरम्यान पीएम किसान योजनेचा मागील हप्ता म्हणजेच १८ वा हप्ता वाशिम येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे महिनाभरापूर्वी जारी केला होता. राज्यातील विधिमंडळ निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दि.०१.०२.२०१९ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाना रु.२०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात रु.६०००/- प्रति वर्षी लाभ देण्यात येतो.
धानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तरप्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Leave a Reply