onion market rate: कांदा बाजारभाव पुन्हा वाढीला; जाणून घ्या कसे आहेत बाजारभाव..

*onion market rate: या आठवड्यात संपूर्ण देशात मागील आठवड्याच्या तुलनेत केवळ २७ ते ३० टक्के कांदा आवक झाली. तर राज्यातील एकूण कांदा आवकही मागच्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आलेली दिसून येते.
 
एरवी रविवारच्या सुटीनंतर सोमवारी नाशिक, पुण्यासह अनेक बाजारात कांदा आवक वाढताना दिसते. पण या सोमवारी उलट चित्र होते. सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त माहितीनुसार राज्यात एकूण १ लाख ४४ हजार क्विंटल कांदा आवक झाली. मागच्या सोमवारी हीच आवक २ लाख ९० हजार क्विंटल इतकी होती.

दरम्यान देशभरातील आवक मागच्या सोमवारी ९१ हजार टन इतकी होती. ती या सोमवारी म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी सुमारे ४० हजार टन इतकी होती. मागील आठवड्यापासून आवक घटत आहे, त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सोमवारी तुलनेने वाढलेले दिसून आले.

सोमवारी लासलगाव बाजारसमितीत मागच्या सोमवारच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळाले. सोमवारी येथे लाल कांद्याची एकूण सुमारे १८ हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त २९०० रुपये आणि सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. पिंपळगाव बाजारसमितीत २२०० रुपये सरासरी बाजारभाव मिळाले.

पुण्याच्या पिंपरी बाजारसमितीत सरासरी २५०० रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजारात १८०० रुपये प्रति क्विंटल, नेवासा घोडेगाव बाजारात २८०० रुपये असे बाजारभाव राहिले. या आठवड्यात बाजारभाव वाढीचा कल दिसून येत आहे.12:53 PM

 
 

Leave a Reply