Market price of tomatoes : पुण्यात टोमॅटोला काय बाजारभाव मिळाले? राज्यात कसे आहेत दर..

Market price of tomatoes : बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लोकल वाणाच्या टोमॅटोची १७३३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४०० रुपये मिळाला. जास्तीत जास्त १२०० रुपये आणि सरासरी ८०० रुपये बाजारभाव मिळाले. पिंपरी बाजारात अवघ्या २८ क्विंटल टोमॅटोची आवक होऊन कमीत कमी १ हजार जास्तीत जास्त १२०० आणि सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळाला.

काल दिनांक ११ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात टोमॅटोची २१७३ क्विंटल आवक होऊन सरासरी ९००, कमीत कमी ६०० तर जास्तीत जास्त १२०० रुपये बाजारभाव मिळाले. कालच्या तुलनेत आज बुधवारी टोमॅटोचे दर घसरलेले दिसून आले.

पिंपळगाव बसवंत येथे सरासरी ५२५, खेड चाकण बाजारसमितीत सरासरी ७५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले.

दरम्यान पिंपरी बाजारात सरासरी १२०० रुपये प्रति क्विंटल, मोशी बाजारात सरासरी ७५० रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले. काल मुंबई बाजारात २२३८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. किमान १ हजार कमाल १२०० तर सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळाला. पनवेल बाजारात ६७५ रुपये प्रति क्विंटल आवक होऊन कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त २ हजार रुपये, तर सरासरी १७५० रुपये बाजारभाव मिळाला.

वैशाली टोमॅटोचे बाजारभाव सध्या पडलेले दिसून येत आहेत. सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला सरासरी ४०० रुपये, जळगावला ५०० रुपये, नागपूरला १०२५ रुपये, कराडला १ हजार रुपये, तर भुसावळला १ हजार रुपये प्रति क्विंटल असे दर आहेत.

Leave a Reply