turmeric market prices : नवीन हळदीला बाजारात काय भाव मिळत आहेत? जाणून घ्या..

turmeric market prices : मागील आठवड्यात नवीन हळद बाजारात दाखल झाली आहे. सद्‌या सांगली बाजारात हळदीला सरासरी १७ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे. दरम्यान शनिवारी वाशिम बाजारात ९० क्विंटल हळद दाखल झाली कमीत कमी बाजारभाव १० हजार १०० आणि जास्तीत जास्त १३ हजार १०१ रुपये, तर सरासरी १२ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

शुक्रवारी सांगली बाजारात राजापुरी हळदीला कमीत कमी १३ हजार ५०० रुपये आणि जास्तीत जास्त २१ हजार तर सरासरी १७ हजार ३०० रुपये बाजारभाव मिळाला. या ठिकाणी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी २२०९ क्विंटल हळद आवक झाली. दरम्यान गुरूवारी सांगली बाजारात हळदीला सरासरी १७ हजार रुपयांचा, तर जास्तीत जास्त २१ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले.

सांगलीच्या नंतर हळदीचा मोठा उत्पादक भाग असलेल्या नांदेड, हिंगोली बाजारात मात्र हळदीचे दर तुलनेने कमी असल्याचे दिसून आले. शुक्रवारी हिंगोली बाजारात १८५० क्विंटल हळद दाखल झाली. किमान दर ११ हजार रुपये, कमाल दर १३ हजार ५०० रुपये आणि सरासरी १२ हजार २५० रुपये असे दिसून आले.

नांदेड बाजारात सुमारे ७० क्विंटल हळद आवक झाली. या ठिकाणी सरासरी ११५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. वाशिम बाजारातही १२ हजार ५००र रुपये सरासरी बाजारभाव मिळाला आहे. मात्र सांगलीनंतर मुंबई बाजारात हळदीने भाव खाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी मुंबई बाजारात कमीत कमी १६ हजार रुपये, जास्तीत जास्त १८ हजार रुपये आणि सरासरी १७ हजार रुपये बाजारभाव प्रति क्विंटल हळदीला मिळाला आहे.

Leave a Reply