sugar factory: देशातील ऊसाचा गळीत हंगाम आता लवकरच संपणार..

sugar factory

sugar factory : यंदा देशातील एकूण 531 कारखान्यांपैकी 454 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता जो गेल्या वर्षीच्या 533 पैकी 505 कारखान्यांच्या तुलनेत 51 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नाही.

दरम्यान 15 फेब्रुवारी 2025 अखेर यापैकी 77 कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे जी गेल्या वर्षीच्या या तारखेला गाळप हंगामाची सांगता झालेल्या 28 कारखान्यांपेक्षा 49 ने अधिक आहे.

म्हणजेच 51 कारखान्यांनी कमी गाळप घेऊन देखील यापैकी 49 कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. देशभरात 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत 2175 लाख टनाचे उस गाळप झालेले आहे जे गेल्या वर्षीच्या या तारखेच्या 2277 लाख टनापेक्षा 102 लाख टनाने कमी आहे. साहजिकच साखर उत्पादन देखील 197.65 लाख टनापर्यन्त झाले असून ते गतवर्षी याच तारखेला झालेल्या 224.75 लाख टनापेक्षा 27.10 लाख टनाने कमी झाले आहे.

देशातला सरासरी साखर उतारा देखील केवळ 9.09 टक्के इतकाच मिळाला असून तो गेल्या वर्षीच्या या तारखेच्या 9.87 टक्क्यापेक्षा 0.78 टक्क्याने कमी आहे. या सगळ्यांची गोळाबेरीज करता यंदाच्या वर्षीचे नवे निव्वळ साखर उत्पादन 270 लाख टनाइतकेच सीमित राहण्याचे अपेक्षित असून जे गेल्या वर्षीच्या 319 लाख टन निव्वळ साखर उत्पादनापेक्षा जवळपास 49 लाख टनाने कमी राहण्याचे अनुमान आहे.

Leave a Reply