Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींचे कार्ड चालेना, म्हणून धनंजय मुंडेंची आजारपणाची खेळी?

Dhananjay Munde

Dhananjay Munde : मागच्या आठवड्यापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू होती. विरोधक नव्हे, तर दस्तुरखुद्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीत त्यांनी गैरहजेरी लावल्याने अनेकांनी त्यांचा राजीनामा निश्चित मानला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंडे यांच्या आजाराची चर्चा सुरू असून त्यांना ब्रेल पाल्सी झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यावर चर्चा होत असताना ही मुंडे यांची स्वत:च्या बचाव करण्याच राजकीय खेळी तर नाही ना असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाल्यानंतर सर्वात आधी मंत्री मुंडे यांचा अत्यंत जवळचा असणारा वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर वाल्मिक कराडला अटक होऊन त्याच्यावर मोक्कासह खूनाचा गुन्हा दाखल झाला. मात्र मंत्री मुंडे यांच्यामागचे राजीनाम्याचे शुष्ककाष्ट काही संपले नाही. मध्यंतरी सहानुभुती मिळविण्यासाठी मुंडेंनी किर्तनकार नामदेव शास्त्री यांचा वापर केला असल्याचे बोलले जात होते.

मात्र नामदेव सानप शास्त्रींवर टिका झाल्यानंतर सानप बॅकफूटवर गेले परिणामी धनंजय मुंडे यांना सहानुभुती देणारे कुणीच उरले नाही. अखेर राजीनामा आणि सत्ता अटळ असल्याचे पाहून त्यांनी हा बनाव तर केला नाही ना? अशी चर्चा आहे. या बाबत दस्तुरखुद्द मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनीच भाष्य केले असून मुंडेंचा आजार खरा की खोटा असा प्रश्न करुणा शर्मा यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजीनाम्यापासून वाचण्यासाठी आजाराचे कारणही उपयोगी पडणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अण्णा मैदानात
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आता मैदानात उतरले असून त्यांनी या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुचवले आहे. त्यामुळे मुंडे आणि कोकाटे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत जाणार असून लवकरच ते राजीनामा देतील किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे.

Leave a Reply