Kanda bajarbhav : देशात कांदा आवक वाढल्याने बाजारभाव घसरले; पण सोमवारी स्थिरावले…

Kanda bajarbhav : मागील आठवड्यात देशात कांदा आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारी लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी २२ रुपये किलोचे दर मिळाले. तर आज सोमवारी बाजार सुरू झाल्यावर पुन्हा एकदा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी पुणे बाजारात सरासरी २ हजार प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले, पिंपळगाव बसवंत बाजारात लाला कांद्याला २२७५ रुपये बाजारभाव मिळाले. येवला बाजारात २२७५ रुपये बाजारभाव मिळाले. नगरच्या घोडेगाव बाजारात २२०० रुपये बाजारभाव मिळाले. या आठवड्याच्या सुरूवातीला आवक आटोक्यात असल्याने बाजारभाव फारसे घसरल्याचे दिसून आले नाही.

देशात अशी झाली आवक:
दिनांक १० ते १६ फेब्रुवारीच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील कांदा आवक वाढली आहे. या काळात गुजरातमध्ये सुमारे १ लाख २ हजार मे. टन कांदा आवक झाली, महाराष्ट्रात ७४ हजार ३८७ मे. टन आवक झाली. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ३४ हजार मे. टन कांदा आवक झाली. देशभरात एकूण २ लाख ८१ हजार २९ मे. टन कांदा आवक झाली.

दिनांक १७ ते २३ फेबुवारी दरम्यानच्या आठवड्यात देशभरात कांदा आवक वाढून ती ३ लाक ४४ हजार ५०० मे. टनापर्यंत पोहोचली. महाराष्ट्रात एकूण १ लाख ४६ हजार मे. टन आवक झाली, तर गुजरातमध्ये ८९ हजार १३० मे. टन कांदा आवक झाली. उत्तर प्रदेशमध्ये ३३ हजार टन, तर कर्नाटकमध्ये १४ हजार टन आवक झाली. मागच्या आठवड्यात आवक वाढलेली दिसून आली. महाराष्ट्रातीलही आवक वाढलेली दिसून आली परिणामी दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

Leave a Reply