Chhaava movie : पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींची कमाई करणाऱ्या छावानं एक एक करत अनेक रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली . तीन दिवसात शंभर कोटींच्या कमाईचा आकडा गाठणारा आणखी कोणते रेकॉर्ड तोडणार याची चर्चा होती, एक तर 2025 हे वर्ष बॉलिवूड साठी म्हणावं इतकं भारी सुरू नव्हतं. पण आला आणि बॉक्स ऑफिसला बुस्टर मिळाला. कमाईचे रेकॉर्ड तुटत गेले आणि पिक्चरची हवा होत गेली. फक्त बॉक्स ऑफिस वर नाही तर सोशल मीडियावर सुद्धा छावाच चर्चेचा विषय आहे.
दोन मित्र भेटले तरी कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा या छावाबद्दलच्याच आहेत. थोडक्यात काय तर छावानं टीझर पासून होणाऱ्या चर्चा खऱ्या ठरवत धुवा केलाय. पण छत्रपती संभाजी महाराजांवर या आधी मराठीमध्ये पिक्चर आले होते . हिंदीमध्ये तर ऐतिहासिक पिक्चर करायची लाट आहे. पण तरीही छावाच एवढा हिट कसा झाला . फेब्रुवारी 2024 मध्ये छत्रपती संभाजी हा पिक्चर थिएटर मध्ये आला होता ,हा पिक्चर तयार झाला होता नऊ वर्षा आधी तेव्हा संभाजी 1689 या नावानं पिक्चर ची चर्चा झाली होती, मग फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या नावानं आणि पाच भाषांमध्ये हा पिक्चर थिएटर मध्ये आला. पण चालला नाही नोव्हेंबर 2024 मध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग एक हा पिक्चर थिएटर मध्ये आला, त्याची कमाई बऱ्यापैकी झाली लोकांमध्ये चर्चा सुद्धा होती पण पुष्पा टू रिलीज झाला आणि त्यानं वन साईड सगळं मार्केट ओढलं आता या दोन्ही पिक्चर बनवणाऱ्यांनी मेहनत घेतली होती. पिक्चरची पब्लिसिटी सुद्धा केली होती. मग तरीही छावाला थिएटर मध्ये गर्दी जमली कशामुळे जमलं या दोन्ही पिक्चरशी तुलना सोडली तरी ऐतिहासिक पट असणारा पहिल्याच आठवड्यात 300 कोटींची कमाई कशी करू शकला हिट होण्याचं पहिलं कारण म्हणजे पॅन इंडिया टार्गेट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर पिक्चर आले सिरीयल सुद्धा आली काही पिक्चर मराठीमध्ये असल्यानं पॅन इंडिया हिट होण्यात कमी पडले तर काही पिक्चरची पब्लिसिटी म्हणावी अशी झाली नाही.
मुळात छत्रपती संभाजी महाराज हे सगळ्या महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा विषय आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्या पराक्रमाविषयी बराच इतिहास अजूनही गुलदस्त्यात असल्याची चर्चा होते. तो छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर आला असला तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर मोठ्या स्केलवर काम न झाल्याची चर्चाही होती. साहजिकच या सगळ्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल ऐतिहासिक प्रसंगांबद्दल बरीच उत्सुकता होती . लोकांच्या मनात असलेली हीच उत्सुकता कॅच करणं छावाला जमलं पण हे जमवताना त्यांनी पॅन इंडिया ऑडियन्स डोळ्यांसमोर ठेवला आणि पिक्चरची आखणी सुद्धा त्याच प्रकारे केली छावाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर मराठी पिक्चरमध्ये संतोष जुवेकर सारखे मराठी कलाकार सुद्धा पण बॉलिवूड मध्ये चरित्रपटांसाठी चांगलं नाव कमवणाऱ्या विकी कौशलची निवड छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी झाली . त्यानंतर महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदनाला निवडण्यात आलं. रश्मिकामुळे साऊथच्या ऑडियन्सला हा पिक्चर उत्सुकतेच्या पलीकडे जाऊन कनेक्ट झाला. म्युझिक सुद्धा ए आर रहमान असल्या पिक्चरला सुरुवातीच्या आठवड्यात जी हाईप मिळणं अपेक्षित होतं ती मिळाली आणि याचा फायदा पहिल्या आठवड्याच्या कलेक्शन साठी झाला. पॅन इंडिया पिक्चर नेताना व्हीएफएक्स आणि इतर तांत्रिक गोष्टी सुद्धा टॉपच्या असणं गरजेचं असतं हीच गोष्ट छावामध्ये जमून आली पिक्चरच व्हीएफएक्स कुठेच खटकणार नाहीये तर सेट साठी सुद्धा भारी काम करण्यात आलंय मग तो राजदरबाराचा सेट असेल किंवा लढाईचा सीन लार्जर दॅन लाईफ वाटतो ,आणि कमाईचे आकडे आपल्याला सतत वाढताना दिसतात जावा हिट होण्याचं दुसरं कारण म्हणजे निवडलेली स्टोरी आता पिक्चर असतोय अडीच किंवा लईत लई साडेतीन तासाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात ज्या वेगाने घटना घडल्या त्या पाहता त्यांच्या सगळ्याच आयुष्याची मांडणी अडीच ते तीन तासात करणं अवघड होतं ,अर्थात हे शक्य झालं असतं पण म्हणावी अशी नाट्यनिर्मिती झाली नसती तर पिक्चर ट्रेलर सारखा वाटला असता.
छावामध्ये स्टोरी निवडणं परफेक्ट जमून आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरच्या काळापासून पिक्चरची सुरुवात होती ,होते औरंगजेब आणि सगळे मुघल जश्न करत असतात पिक्चर मध्ये संभाजी महाराजांची एंट्री होते बुराणपूर स्वारीच्या सीनमध्ये त्यानंतर पिक्चरच्या पहिल्या हाफ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची युद्धकला त्यांचा मुत्सद्दीपणा आणि अपार शौर्य पाहायला मिळतं पण पिक्चर खऱ्या अर्थाने ग्रीप मिळवतो तो सेकंड हाफ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला असताना झालेली अटक त्यानंतर त्यांचा औरंगजेबासमोर येणं या दोघांमधला संवाद आणि छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने केलेला याबद्दल इतिहासातही बरच गोड आहे. सोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल जितकी प्रेरणा त्यांच्या पराक्रमातून त्यांनी जिंकलेल्या लढायांमधून मिळते तशीच प्रेरणा महाराजांनी आपल्या अंतिम दिवसात जी हिंमत आणि स्वाभिमान औरंगजेबाला दाखवला त्यातूनही मिळते. साहजिकच जास्त अपरिचित प्रसंग न दाखवता छावाची सगळी स्टोरी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल ज्यामुळे उत्सुकता आहे त्याच प्रसंगांशी कनेक्टेड ठेवता आली आणि हिट झाला. छावा पिक्चरमध्ये संभाजी महाराजांच्या स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज आवाजाच्या रूपात दाखवल्या आहेत पण आई सईबाई यांना संभाजी महाराज अगदी शेवटपर्यंत शोधत राहिले महाराणी सईबाई गेल्या तेव्हा संभाजी महाराज फार लहान होते साधारणतः 31 वर्षांच्या आयुष्यात ते परक्यांबरोबर सतत लढत राहिले पण त्यांचं सबकॉन्शियस माइंड कायम आईला शोधताना दाखवलंय पिक्चर मधल्या या सीनमुळे विषय फक्त शौर्याचा किंवा ताकदीचा होत नाही तर भावनेचा सुद्धा होतो.
पिक्चर संपल्यावर वर लोक शून्य होऊन बाहेर पडतात आणि माऊथ पब्लिसिटी वाढत राहते हिट होण्याचं तिसरं कारण म्हणजे पिक्चर रिलीज होण्याचं टाइमिंग आता छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर येणारा पिक्चर कधीही आला तरी तो हिट झालाच असता पण कमर्शियली विचार करताना पिक्चरचं टाइमिंग हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण त्यावर पिक्चरला मिळणाऱ्या स्क्रीन्स पिक्चरला मिळणारा रिस्पॉन्स या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात छावानं ही गोष्ट अगदी परफेक्ट जमवली आधीच्या अनाउन्समेंट नुसार 6 डिसेंबरला पुष्पा टू सोबत रिलीज होणार होता पण त्यानंतर छावाची तारीख पुढे ढकलण्यात आली आता दोन्ही पिक्चरचे विषय वेगळे असले तरी पुष्पा टू न महाराष्ट्राच्या बाहेरचं मार्केट वन साईड ओढलं असतं साहजिकच महाराष्ट्रात सुद्धा छावाला आता ज्या संख्येने स्क्रीन्स मिळतात त्याची संख्या थोड्या प्रमाणात कमी होऊ शकली असती आणि महाराष्ट्राच्या बाहेर पिक्चरच्या बिझनेसवर फरक पडला असता फक्त पुष्पा सोबतची स्पर्धाच नाही तर अशा वेळी रिलीज झाला जेव्हा बॉलिवूडचा एकही पिक्चर स्पर्धेत नव्हता किंवा चर्चेतही नव्हता . बॉलिवूड ला थिएटर बिझनेस सुरू ठेवण्यासाठी जुने पिक्चर रिलीज करावे लागत होते. त्याच वेळी आला आणि थिएटर वाल्यांच्या बिझनेसचा सीन पूर्ण बदलून गेला . पहाटे तीन वाजताही पिक्चरचे शोध थिएटरमध्ये लागले साहजिकच बिझनेसला बुस्ट मिळाला छावानं आणखी एका गोष्टीत टाइमिंग साधलं ते म्हणजे शिवजयंतीच्या आठवड्यात रिलीज झाला शिवजयंतीची तयारी महाराष्ट्रात साधारण आठवडाभर आधीपासून सुरू होते ही तयारी वातावरण निर्मिती करण्यात सुद्धा महत्त्वाची असते. साहजिकच याचा फायदा पिक्चर चालण्यासाठी झाला अनेकांनी शिवजयंतीमुळे पिक्चरचे शो आयोजित केले किंवा मिळालेल्या सुट्टीच्या निमित्तानं बघितला साहजिकच छावाच टाइमिंग परफेक्ट बसलं आणि हिट झाला छावानं फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर भारताबाहेरही चांगला बिझनेस केलाय पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा आकडा पार केल्यानंतर आता नेमकी किती कमाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.












