rising temperatures : कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, केळी, आंबा व द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी, असा सल्ला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
भाजीपाला पिकाचे व्यवस्थापन:
भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
फुलशेतीची अशी घ्या काळजी:
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.












