Maldandi sorghum : पुण्यात मालदांडी ज्वारी पोहोचली पाच हजारापर्यंत..

Maldandi sorghum : सध्या राज्यात अनेक बाजारात ज्वारीची आवक सुरू झाली आहे. काही ठिकाणी ज्वारीला चांगला बाजार मिळताना दिसून येत आहे. दरम्यान काल महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यात मालदांडी ज्वारीची ७१९ क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ४३०० रुपये, जास्तीत जास्त ५६०० रुपये तर सरासरी ४९५० रुपये प्रति क्विंटल असे दर होते.

नगर जिल्ह्यातील कर्जत बाजारात मालदांडी ज्वारीची १३३ क्विंटल आवक होऊन सरासरी ३ हजार रुपयांचे प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. दरम्यान एक दिवसांपूर्वी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात मालदांडी ज्वारीला सरासरी ४८०० रुपयांचे दर होते. ते काल वाढल्याचे दिसून आले.

सांगली बाजारात शाळूच्या ज्वारीला मंगळवारी सरासरी ३७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जालना बाजारात याच प्रकारच्या ज्वारीला सरासरी २४०० रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये २७९० रुपये, तर परतूरला १७०० रुपये प्रति क्विंटल दर शाळू ज्वारीला मिळाला.

दरम्यान पांढऱ्या ज्वारीला तुलनेने कमी दर मिळत आहेत. धुळे जिल्ह्यात २५ फेब्रुवारी रोजी पांढऱ्या ज्वारीला सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल, पाचोरा येथे सरासरी २१२१ रुपये प्रति क्विंटल, दौंड-केडगावला ३ हजार सरासरी तुळजापूरला ३५०० रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.03:05 PM

 
 

Leave a Reply