Rajapuri turmeric : राजापुरी हळदीला सांगलीत काय दर मिळतोय? जाणून घ्या…

Rajapuri turmeric : सध्या बाजारात हळदीची आवक सुरू असून अनेक ठिकाणी सरासरी ११ हजार ते १७ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हळदीला मिळताना दिसत आहे. तर मागील दोन दिवसांपासून सांगली, नांदेड, हिंगोली येथील हळदीचे बाजारभाव किंचितसे वाढताना दिसून येत आहेत.

महाशिवरात्रीच्या आधी म्हणजेच मंगळवारी सांगली बाजारात राजापुरी हळदीची सुमारे ८ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी १३५०० रुपये, जास्तीत जास्त २३००० रुपये आणि सरासरी १८२५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी हळदीला मिळाला आहे.

दरम्यान सोमवारच्या तुलनेत राजापुरी हळदीला सांगलीत मिळालेल्या दरात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी किमान १३ हजार ४०० रुपये, जास्तीत जास्त २३००० रुपये आणि सरासरी १८२०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. रविवारी हाच बाजारभाव १७ हजार ८५० इतका होता.

दरम्यान मागील आठवड्याचा आढावा घ्यायचा ठरवल्यास हळदीला सरासरी ११ हजार ८०० रुपये बाजारभाव प्रति क्विंटलसाठी मिळत होते. या आठवड्यात त्यात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी मुंबई बाजारात लोकल हळदीला १७ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. नांदेड बाजारात हळदीला सरासरी ११ हजार ८०० रुपये, तर कमीत कमी ९ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सोमवारी हिंगोली बाजारात नांदेडला ११ हजार ७९५, तर हिंगोली बाजारात ११ हजार १०५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले.

Leave a Reply