Kanda bajarbhav : उन्हाळी कांदा आवक वाढतेय, बाजारभाव मार्च एन्डपर्यंत कसे राहतील? जाणून घ्या…

Kanda bajarbhav : कांदा बाजारभावामुळे सध्या गदारोळ होत असून शेतकऱ्यांमध्ये भाव घसरल्याने नाराजी पसरली आहे. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की १५ मार्चपर्यंत बाजारभाव कसे राहतील, तसेच काहींना मार्च एन्डपर्यंत बाजारभाव कसे राहतील त्याची काळजी आहे. यासंदर्भात राज्य आणि देशपातळीवरील आवकेनुसार आपण विश्लेषण करू यात.

राज्यातील उन्हाळी कांदा आवक:
मंगळवारी लासलगावच्या लाल कांद्याला १६२५ रुपये तर पुण्यात १२०० रुपये, राहता १ हजार रुपये
उन्हाळी कांदा लासलगावला १६५० रुपये, अंदरसुल, कळवण, सटाणा, देवळा, पिंपळगाव कोपरगाव, येथे १३०० ते १५०० रुपये.

राज्यात एकूण आवक झाली केवळ २ लाख १७ हजार क्विंटल, सोमवारी एकूण आवक होती. ४ लाख ४२ हजार त्यातही एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांदा आवक झाली ६० हजार क्विंटल, तर लाल आणि पोळ कांदा आवक एकट्या नाशिक जिल्ह्यात १ लाख ३३ हजार क्विंटल. नगर जिल्ह्यात उन्हाळी कांदा आलाय ८८ हजार २०४ क्विंटल होती.

देशपातळीवरील कांदा आवक:
३ मार्च ते ९ मार्च दरम्यान (सोमवार ते रविवार) : ३ लाख ६७ हजार २३४ मे.टन कांदा देशभरात बाजारात आला. त्यात गुजरातमधून आलाय ९८ हजार मे. टन, महाराष्ट्रातून आलाय १ लाख ७१ हजार मे. टन कांदा आवक झाली.

त्याआधीच्या आठवड्यात बाजारात आलेला कांदा होता ३ लाख २६ हजार ३०० मे. टन, त्यौकी गुजरातमध्ये १ लाख ५ हजार मे.टन, तर महाराष्ट्रात होता १ लाख २८ हजार मे.टन आलेला होता. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक सुमारे ४० हजार टनांनी वाढली आहे. गुजरातमधील कांदा आवक टिकून आहे. राज्यातील कांदा आवक मात्र वाढली आहे.

मार्चएन्ड पर्यंत कसे असतील बाजारभाव..
उन्हाळी कांद्याचे खूप उत्पादन होईल या बातम्या आल्या आणि त्या भीतीने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीत हात आखडता घेतला. परिणामी बाजारभाव पडायला सुरूवात झाली अशी माहिती लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येणाऱ्या काळात बाजारभाव कसे असतील? हे विचारले असता त्यांनी ते १ हजार ते १५०० रुपयांच्या दरम्यान प्रति क्विंटल असू शकतील अंदाज दिला आहे. मात्र यात बदलही होऊ शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *