Kanda Rate : सोमवारी कांदा आवक घटली; मात्र तरीही दरात घसरण; देशातील कांदा आवक अशी आहे…

Kanda Rate : सोमवार, १७ मार्च रोजी राज्यातील बाजारात एकूण १,४९,५६५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक ४४,८३० क्विंटल तर लाल कांद्याची आवक २१,६४० क्विंटल होती. राज्यभरातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या चढउताराची नोंद झाली नसली तरी काही ठिकाणी सौम्य घट दिसून आली.

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा दाखल झाला असून, उन्हाळी कांद्याला सरासरी १४४७ रुपये दर मिळाला. लाल कांद्याला १४२२ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून सरासरी दर १३९० रुपये इतका राहिला. सोलापूर बाजारात लाल कांद्याचा दर १४५० रुपये होता.

अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याला ११९७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. स्थानिक कांद्याची आवक तुलनेने कमी असली तरी त्याला १७०० रुपयांचा दर मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उन्हाळी आणि लाल कांद्याचा सरासरी दर अनुक्रमे १३५० रुपये होता.

काही बाजारात उन्हाळी कांद्याच्या दरात किरकोळ घट दिसली असली तरी एकूण बाजारपेठ स्थिर असल्याचे जाणवत आहे. नाशिक आणि पुणे या कांदा उत्पादक भागांमध्ये आवक जास्त असल्याने दरावर त्याचा परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. उन्हाळी कांद्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याने आगामी काळात दरात आणखी काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

*देशातील कांदा आवक*

सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी देशभरातील बाजारपेठांमध्ये एकूण ३८,५७८ टन कांद्याची आवक झाली. यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली असून येथे सर्वाधिक १६,००४ टन कांदा दाखल झाला.

गुजरातमध्ये १०,१०२ टन कांदा बाजारात आला. राजस्थानमध्ये ९६० टन, उत्तर प्रदेशमध्ये ४,७८० टन, मध्य प्रदेशमध्ये १,८०६ टन आणि तेलंगणामध्ये १,४०३ टन कांदा दाखल झाला. कर्नाटकमध्ये तुलनेने कमी म्हणजेच २२३ टन कांद्याची आवक झाली. राज्यात आणि देशभरात कांद्याची आवक वाढत असल्याने दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply