Agricultural laborers : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक: शेतमजुरांचा शेतीकडे पुन्हा कल वाढला; केंद्रीय सर्व्हेतून माहिती आली समोर..

Agricultural laborers

Agricultural laborers : देशभरात शेतमजुरांचा शेतीकडे वाढता कल दिसून येत आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने केलेल्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शेतीत कार्यरत असलेल्या कामगारांची टक्केवारी गेल्या काही वर्षांत स्थिर राहिली आहे.

पीएलएफएस सर्वेक्षणानुसार शेतीतील कामगारांची टक्केवारी:

2020-21: 46.5%
2021-22: 45.5%
2022-23: 45.8%

तसेच, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामविकास बँकेच्या अखिल भारतीय ग्रामीण वित्तीय समावेशन सर्वेक्षणानुसार 2016-17 मध्ये शेतकरी कुटुंबांची टक्केवारी 48% होती, तर 2021-22 मध्ये ती वाढून 56.7% झाली आहे.
शेती हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असला, तरी केंद्र सरकारही विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे.

ग्रामीण युवक आणि महिला शेतकऱ्यांसाठी कमी कालावधीच्या कृषी-आधारित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

शीतगृहे, गोदामे आणि प्रक्रिया संयंत्र उभारण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज पुरवठा केला जातो. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण शेतीला चालना दिली जाते.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली. सरकारच्या विविध योजनांमुळे शेतमजुरांचा शेतीकडे वाढता कल दिसून येत असून, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Leave a Reply