Rabi crop : देशभरात रबी हंगामातील पेरणी आणि काढणीची गती चांगली असून, प्रमुख रबी पिकांची स्थिती समाधानकारक आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार विविध राज्यांमध्ये पेरणी आणि काढणीचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
ज्वारीची पेरणी २४.७७ लाख हेक्टरवर झाली असून, आतापर्यंत देशभरात ७३.८९ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. तमिळनाडूमध्ये संपूर्ण काढणी झाली असून, महाराष्ट्रात ८५ टक्के, कर्नाटकमध्ये ५१ टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये १३ टक्के काढणी पार पडली आहे.
मका २२.९२ लाख हेक्टरवर पेरले गेले असून, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी ७० टक्के, कर्नाटकमध्ये ४६ टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये २५ टक्के काढणी पूर्ण झाली आहे.
हरभऱ्याच्या ११२.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, राजस्थानात ८५ टक्के, मध्य प्रदेशात ७५ टक्के, महाराष्ट्रात ६५ टक्के, कर्नाटकमध्ये ६० टक्के आणि उत्तर प्रदेशात ३० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.
गव्हाची पेरणी ३४२.३२ लाख हेक्टरवर झाली असून, मध्य प्रदेशात ५८ टक्के, राजस्थानात ५० टक्के आणि उत्तर प्रदेशात २० टक्के काढणी झाली आहे.
कडधान्यांमध्ये इतर डाळींच्या उत्पादनातही वाढ दिसून येत असून, महाराष्ट्रात ९७ टक्के, तमिळनाडूमध्ये ९५ टक्के, आंध्र प्रदेशमध्ये ६० टक्के, आसाममध्ये ५० टक्के, गुजरातमध्ये १५ टक्के आणि कर्नाटकमध्ये १० टक्के काढणी पूर्ण झाली आहे.
देशभरातील रबी हंगाम सकारात्मक दिशेने जात असून, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारपेठेची साथ मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सरकारच्या धोरणांवरही शेती अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी परिणाम होणार आहे.












