today kanda bajarbhav : पिंपळगाव बसवंत बाजारात आज ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पोळ कांद्याला सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळाला. उन्हाळी कांद्याची पिंपळगावमध्ये १५ हजार क्विंटल आवक झाली.
दरम्यान आज लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मागच्या सोमवारी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव या दोन्ही बाजारात तब्बल १०० ते २०० रुपयांनी घटले होते. आठवड्याच्या सुरूवातीला त्यात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र ही वाढ फार नसून बाजारभाव स्थिर आहेत.
दरम्यान आज पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर कराड बाजारात १६०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.
मागच्या सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला सरासरी १,२३५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. त्याच दिवशी पुणे बाजारात कांद्याला सरासरी १,५५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. लासलगाव बाजारात याच दिवशी उन्हाळी कांद्याचा सरासरी दर १,१६० रुपये प्रतिक्विंटल इतका होता.
संपूर्ण राज्यभरात ३१ मार्च ते ७ एप्रिल या आठवड्यात राज्यभरात उन्हाळी कांद्याला सरासरी सुमारे १,१६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे पाहायला मिळते. मागच्या सोमवारच्या तुलनेत दरात थोडीशी घसरण दिसून आली आहे. दरम्यान यामुळे उन्हाळी कांद्याच्या भावात सध्या स्थैर्य असले तरी येत्या काळात दरांमध्ये अधिक चढउतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील मोठ्या बाजारांतील आवक आणि मागणी यावर याचा परिणाम होणार आहे.












