Gram market : राज्यात हरभरा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घेऊ यात..

Gram market : सध्या बाजारातील हरभऱ्याचे दर हमीभावाच्या आसपास आहेत, काही बाजारात थोडीशी सुधारणा दिसून येत आहे. मात्र संपूर्ण राज्यात भाव स्थिर होण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक बाजार समित्यांचा भाव पाहूनच विक्रीचा निर्णय घेण्याची गरज आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी जालना (1118 क्विंटल), नागपूर (956), हिंगणघाट (1910) या बाजारांमध्ये हरभऱ्याची मोठी आवक नोंदली गेली. सरासरी बाजारभाव ५४०० ते ५७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला. तर १३ एप्रिल रोजीही आवक सुरूच राहिली आणि बाजारभाव काहीसा स्थिर राहिला.

केंद्र सरकारने २०२५ साठी हरभऱ्याचा किमान हमीभाव ५६७५ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहता, अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या मिळणारा सरासरी बाजारभाव हा या हमीभावापेक्षा कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होतो आहे.

प्रमुख बाजारातील स्थिती:
– सर्वाधिक आवक: हिंगणघाट बाजारात १९१० क्विंटल, सरासरी दर ५६१५ रुपये
– सर्वात कमी आवक: परांडा, रावेर, पठाण (प्रत्येकी १ क्विंटल), यामध्ये सर्वाधिक दर ५६०० रुपये (वडूज, रावेर)

विविध प्रकारच्या हरभऱ्याची स्थिती:
– लाल हरभरा: लातूर येथे सर्वाधिक – ७७०२ क्विंटल, सरासरी दर ५९०० रुपये
– चाफा हरभरा: मलकापूर – २२४० क्विंटल, दर ५६९० रुपये
– काट्या हरभरा: मंगळपीर – ११५४ क्विंटल, दर ५६५० रुपये
– काबुली हरभरा: जालना – ३३० क्विंटल, दर ७००० रुपये
– गरडा हरभरा: दयापूर – १२०० क्विंटल, दर ५८४० रुपये
– जंबो हरभरा: लासलगाव – ३ क्विंटल, दर ६२९९ रुपये
– हायब्रीड हरभरा: पिंपळगाव (बसवंत) – १४ क्विंटल, दर ८००० रुपये

निवडक बाजारातील सरासरी भाव:
– लातूर – ५९०० रुपये
– धुळे – ५७०० रुपये
– जालना – ५७०० रुपये
– अमरावती – (कारंजा जवळ ५६५५ रुपये)
– नागपूर – ५७४० रुपये
– हिंगणघाट – ५६१५ रुपये
– उमरेड – (उमरखेड – ५५५० रुपये)
– दोंडाईचा – ६२०० रुपये (काबुली हरभरा)