Pahalgam attack : मुनीर आऊट दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हा हॅशटॅग चांगला ट्रेंड होतोय पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरन आपल्या कुटुंबाला परदेशात पाठवल्यानंतर आता तो सुद्धा देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या यायला लागलेत त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख घाबरल्याचं बोललं जातय. पण हाच आसिम मुनीर पेहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे आरोपही आता व्हायला लागलेत. पाकिस्तानी लष्करातील काही लोकच या गटात सहभागी असल्याच समोर आल्याने आता यामध्ये तथ्य असल्याचही म्हटलं जातय.
पहेलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी मुनीरन हिंदूंबद्दल आणि काश्मीर बद्दल प्रक्षोभक भाषण केलं होतं. तशीच भाषा काही महिन्यांपूर्वी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या सैफुल्ला कसुरीन वापरली होती . त्यामुळे हल्ल्यासाठीचा सिग्नल हा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनाच दिला असल्याचं बोललं जातय. गेल्या काही महिन्यातली टाईमलाईन पाकिस्तानच्या पत्रकारांकडून आणि जनतेकडून होणारे आरोप यामुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर याचाच हात असल्याचं स्पष्ट होतय. मुनीरला हा हल्ला का घडवायचा होता याचीही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे.
असीम मुनीर पहेलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप का होतोय? त्याने केलेली भाषणं आणि गेल्या काही महिन्यातल्या घटनांचा अर्थ काय लागतो? त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. सगळ्यात आधी पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर बद्दल सध्या चर्चा काय होत आहेत ते बघूयात 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई केली त्यानंतर पाकिस्तानातील नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना परदेशात पाठवल्याची माहिती देण्यात आली यामध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरनही आपल्या कुटुंबीयांना प्रायव्हेट जेटन न्यू जर्सी आणि ब्रिटनला पाठवल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर 27 एप्रिलला स्वतः आसिम मुनीर ही पाकिस्तानातून पळून गेल्याच्या किंवा भूमिगत झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. सोशल मीडियावर मुनीर आउट असा हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला. याबाबत पाकिस्तानी लष्कर किंवा सरकार कडून कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. पण पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. एबोटाबाद इथल्या पाकिस्तान मिलिटरी अकॅडमीतल्या अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा फोटो पाकिस्तान पीएमओन पोस्ट केला यामध्ये शरीफ यांच्या शेजारी आसिम मुनीर बसला होता. हा फोटो 26 एप्रिलचा असल्याचही पीएमओ कडून नमूद करण्यात आलं होतं. पण या फोटोशिवाय मुनीर पाकिस्तानात असल्याचा कोणताही पुरावा पाकिस्तान कडून देण्यात आलेला नाही. त्यामुळं भारताच्या कारवाईच्या भीतीने मुनीर पाकिस्तानातून पळाल्याच्या चर्चा व्हायला लागल्या. आता आसिम मुनीर नच पहेलगाम मध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणल्याचे आरोप केले जातात. पेहलगाम हल्ल्या आधी मुनीरन हिंदूंविरोधी भडकाऊ भाषण केलं होतं. त्यानंतरच पहेलगाम मध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आलं असा खळबळजनक दावा पाकिस्तानातील पत्रकार आदिल रजा यांच्याकडून करण्यात आला. तर अमेरिकेतील सुरक्षातज्ञ मायकल रुबेन यांनी तर मुनीरची तुलना थेट लादेनशी केली . पाकिस्तानला दहशतवादी पुरस्कृत देश म्हणून आणि पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरला दहशतवादी म्हणून घोषित करावं अशी मागणी रुबिन यांनी अमेरिकेच्या सरकारकडे केली होती.
ओसामा बिन लादेन आणि मुनीर मध्ये इतकाच फरक आहे की लादेन गुहेत राहायचा तर मुनीर राजवाड्यात राहतो हा एक फरक सोडला तर दोघही सारखेच आहेत आणि त्यांचा अंतही सारखाच असायला हवा असं मायकल रुबेन यांनी जाहीरपणे म्हटलं होतं पण पेहलगाम हल्ल्याला आसिम मुनीर जबाबदार असल्याची कोणती कारणं सांगितली जातात ते आता बघूयात.
16 एप्रिल 2025 म्हणजेच पेहलगाम हल्ल्याच्या फक्त सहा दिवस आधी आसिम मुनीरन इस्लामाबादच्या ओवरसीज पाकिस्तानी कन्नेंशन मध्ये एक भाषण केलं होतं त्या भाषणात त्याने थेट हिंदूंबद्दल प्रक्षोभक विधान केली आणि काश्मीरवरून भडकवण्याचं काम केलं या भाषणात बोलताना मुनीर म्हणाला पाकिस्तानची गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच सांगितली पाहिजे आपण हिंदूंपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत अस आपल्या पूर्वजांना वाटलं आपला धर्म आपल्या प्रथा परंपरा विचार महत्त्वाकांक्षा हिंदूंपेक्षा खूप वेगळ्या आहेत म्हणूनच त्यावेळी टू नेशन थेअरीचा पाया रचला गेला.
भारत आणि पाकिस्तान दोन वेगळे देश आहेत ते कधीच एकत्र नव्हते असं मुनीरन म्हटलं त्यानंतर काश्मीर बाबत बोलताना तो म्हणाला काश्मीर बद्दल आमची आणि आमच्या सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे काश्मीर आमच्या गळ्याची नस होती आणि ती कायमच राहील हे आपण कधीही विसरून चालणार नाही आपण काश्मीर साठी तीन वेळा युद्ध लढलोय असं मुनीरन म्हटलं. 16 एप्रिलला मुनीरन केलेली ही विधानच पेहलगाम हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मोठा सिग्नल आणि मोठा ट्रिगर असल्याचं बोललं गेलं जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एसपी वैद यांनीही मुनीरच्या या भाषणाचा संदर्भ देत म्हटलं की हल्ल्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी केलेली ही विधान आणि त्यानंतर झालेला हा हल्ला हा काही फक्त योगायोग नाही हे कोणी साधेसुधे दहशतवादी नाहीत हे पाकिस्तानी आर्मीचेच लोक आहेत जे दहशतवाद्यांचा वेश घेऊन इथे आलेत त्यांच्याकडे सैन्याची शस्त्र आहेत कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये असलेल वातावरण बिघडवण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न आहे असा आरोप वैद्यांनी केला वैद्यांच्या या आरोपात तथ्य असल्याच कारणही आता समोर येतय पेहलगाम हल्ल्यातला दहशतवादी म्हणून ज्याची ओळख पटवण्यात आली आहे तो हाशिम मुसा हा आधी पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहिती समोर आली आहे मुसा हा पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सेसचा पॅराकमांडो होता जो आता दहशतवादी संघटना एलईटी साठी काम करतोय. पाकिस्तानी सैन्याची विंग असलेल्या एसएसजी म्हणजेच स्पेशल सर्विस ग्रुपनच मुसाला दहशतवादी हल्ला करायला काही दिवसांसाठी एलईटी कडे सोपवल्याचा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे.
पाकिस्तानच्या एसएसजी कमांडोना दिलं जाणार ट्रेनिंगच दहशतवाद्यांना दिलं जातं असंही सांगण्यात येतय. 16 एप्रिलला मुनीरच्या या भाषणानंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजेच 18 एप्रिलला एलईटीचा दहशतवादी अबू मुसान रावळकोट मधल्या रॅलीत एक भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनं जिहाद सुरूच राहील. बंदुकीतून गोळ्याही सुरूच राहतील आणि काश्मीरमध्ये शिरच्छेद होतच राहतील. काश्मीरचे स्थानिक नसलेल्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट देऊन काश्मीरची डेमोग्राफी बदलण्याचा भारताचा डाव आहे. पण आम्ही ते कधी होऊ देणार नाही असा थेट इशारा मुसा कडून त्यावेळी देण्यात आला होता.
अबू मुसा हा एलईटीचा पीओके हेड असल्याची माहितीही देण्यात येते आसम मुनीर पहेलगाम हल्ल्या मागचा मास्टरमाइंड आहे असं म्हणायला गेल्या काही महिन्यातल्या घटनांचाही संदर्भ दिला जातोय याची सुरुवात होते ती फेब्रुवारी 2025 पासून एलईटीचा सदस्य आणि पहेलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचं नाव पुढं आलं त्या सैफुल्ला कसुरी उर्फ खालिदनं 2 फेब्रुवारी 2025 ला पाकिस्तानात एक भाषण दिलं होतं. त्यात मी तुम्हाला खात्री देतो की लवकरच 2 फेब्रुवारी 2026 रोजी काश्मीरसह काश्मीर अल्लाहचा जहांगीर बनेल इस्लामचा भाग असेल असं वचन देत असल्याचं सैफुल्लान या भाषणात म्हटलं होतं सैफुल्लाच हे भाषण आणि मुनीरच्या भाषणात साम्य असल्याचं दिसून येतंय. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2025 ला सैफुल्लाची पाकिस्तानी रेंजर्सचे विंग कमांडर जाहीर जरी सोबत बैठक झाल्याची माहितीही काही माध्यमांकडून देण्यात आली आहे.
या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या बैठकीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सैफुल्ला कसुरीनं पाकिस्तानातील पंजाबच्या कसूर इथे काही दहशतवाद्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी अबू मुसा ,मोहम्मद नवाज ,इद्रीस शाहीन, अब्दुल रसूल आणि अब्दुल्ला खाली हे दहशतवादी या बैठकीत आले होते. त्याच बैठकीत भारतात मोठा नरसंहार करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन आखण्यात आल्याची माहिती देण्यात येते. त्यानंतर या सगळ्यांची मार्चच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मिरपूरच्या खंबाल येथे बैठक झाली. त्यावेळी हल्ल्याच ठिकाण तिथले लपण्यासाठीचे तळ घुसखोरीचे मार्ग आणि हल्ल्यात कोणाला टार्गेट करायचं हे निश्चित झालं त्यानंतर 11 मार्चला अबू मूसा आणि सैफुलला खाली दोघही मिरपूरमध्ये पुन्हा एकदा भेटले आणि तिथेच पहेलगाम हल्ल्याचा प्लॅन झाल्याचा अंदाज काही माध्यमांकडून वर्तवण्यात आलाय त्यानंतर 16 एप्रिलला आसिम मुनीरन काश्मीर बद्दल भाषण केल्यानंतर 18 एप्रिलला अबू मुसान काढलेल्या रॅलीत हल्ल्याचा प्लॅन करणारे अबू मुसा मोहम्मद नवाज इदरीस शाहीन अब्दुल रसूल आणि अब्दुल्ला खाली हे सगळे दहशतवादी उपस्थित असल्याचही सांगितलं जातय. एकंदरीतच पाकिस्तानी लष्कराशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सैफुल्लांना हल्ल्याचा प्लॅन करण पाकिस्तानी सैन्यातील हाशिम मुसाचा हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग असणं लष्करप्रमुख आसिम मुनीरच्या भाषणानंतर फक्त सहा दिवसात पहेलगाम मध्ये हल्ला होणं या सगळ्या घटना हल्ल्याच्या तळाशी पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर असल्यास दाखवतात बलूचिस्तान सिंध आणि खैबर पाथुनख्वा इथल्या जनतेत पाकिस्तानी लष्कर आणि आसिम मुनीर बद्दल मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.
पाकिस्तानी पंजाब मध्येही इमरान खानच्या समर्थकांना बळजबरीने तुरुंगात टाकण्याचा मुनीरवर आरोप होतोय . पाकिस्तानच्या सामान्य जनतेत मुनीर बद्दल मोठी चीड आहे त्यामुळे आपल्या विरोधातलं वातावरण पुसून टाकण्यासाठी ते शांत करण्यासाठी आसिम मुनीरन हे काश्मीर कार्ड खेळल्याचे आरोप होतायत . आता तोच आसिम मुनीर पळून गेल्याचही बोललं जातय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पहेलगाम हल्ल्याला पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनिराज जबाबदार आहे का ?












