राज्यातील ग्रामपंचायतीमधील 3666 जांगासाठीच्या पोटनिवडणुकीची घोषणा, 18 मे रोजी मतदान

 राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकाच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. त्यातच आता राज्यातील विविध ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंयतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे.

राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतमधील रिक्त जागांवर पोटनिवडणुका होणार आहे. ग्रामपंचायतीमधील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुका होणार आहेत. त्यासाठी 18 मे 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली आहे.

निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 3 मे 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 19 मे 2023 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. 

…तर तीन महिन्यांत महापालिका निवडणुका शक्य 
ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणीला वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होतील असा प्रश्न सतत विचारला जात आहे. “ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर तीन महिन्यांत याबाबत कोर्टाचा निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर नगर परिषद, मनपा व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा विषय मार्गी लागू शकेल, असे सावे म्हणाले होते. दरम्यान ऑगस्ट 2022 पासून ओबीसी आरक्षण, प्रभागरचना याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तर सुनावणीला वारंवार तारीख पे तारीख मिळत असल्याने उशीर होत आहे. परिणामी राज्यातील महापालिका निवडणुकांना ब्रेक लागला आहे. तर सुनावणी कधी संपणार, यावर न्यायालयाचा निकाल कधी येणार यावर सर्व पुढील गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुका पावसाळ्यानंतरच होईल असा अंदाज बांधला जात आहे.

source:- abplive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *