शेतकरी बांधवांनो आता तुमच्या जमिनीचा नकाशा बघा ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरच

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टी बद्दल माहिती घेणार आहोत. ही गोष्ट म्हणजे आपल्या गावातील किंवा आपल्या शेतातील जमिनीचा नकाशा आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरती अगदी ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो. यासोबत शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता काढायचा असेल, यासोबतच जमिनीच्या हद्द कोणते आहे या संदर्भात बद्दल विविध माहिती आपण ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वरती बघू शकतो. नक्की काय आहे प्रक्रिया व वरील माहिती कशाप्रकारे बघायची ते जाणून घेऊया

E Mahabhumi Nakasha

केंद्र शासनाने अलीकडे आठ अ खाते उतारा या सोबतच सातबारा उतारा अशी विविध माहिती ऑनलाईन पद्धतीने बघण्यासाठी ऑनलाईन नकाशा उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे आपण घरबसल्या आपल्या शेतातील जमिनीचा व गावातील जमिनीचा नकाशा मोबाईल वरूनच पाहू शकतो.

भू नकाशा ऑनलाईन कसा बघायचा?

1) अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन जमिनीचा आणि गावचा नकाशा पाहू शकता.

2) मित्रांनो सर्वात प्रथम महा नकाशा महाभुमी या शासनाच्या संकेतस्थळावरती भेट देऊन त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे. शासनाच्या संकेतस्थळावरती भेट देण्याकरिता लेखाच्या सर्वात खाली दिलेले लिंक वरती क्लिक करावे.

3) शासनाच्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर संकेतस्थळाचे मुख्य पृष्ठ ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य सर्वात प्रथम निवडायचे आहे.

4) त्यानंतर कॅटेगिरी पर्यायांमध्ये रुलर किंवा अर्बन असे ऑप्शन निवडावेत. मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला रुलर ऑप्शन निवडावा लागेल आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन ऑप्शन निवडावा.

5) सर्व पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा नकाशा लोड होईपर्यंत वाट बघावी लागेल.

6) आता यामध्ये तुमचा नकाशा उजव्या साईडला झूम करून किंवा झूम आऊट करून पाहू शकता.

7) झूम इन किंवा आउट करण्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी अधिक किंवा वजा चिन्ह वरती क्लिक करावे लागेल.

8) अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही घरबसल्या तुमच्या गावाचा किंवा शेतीचा नकाशा तुमच्या मोबाईल वरती ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात.

9) शासनाच्या संकेतस्थळावरती जाण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp#home-pane

source:- marathisanhita

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *