Rain update : हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. २० ऑक्टोबरपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
☔ पावसाची शक्यता — दिवसानुसार
गुरुवार (१७ ऑक्टोबर)
जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पश्चिम छत्रपती संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
शुक्रवार (१८ ऑक्टोबर)
बुलढाणा, धुळे, नाशिक, सह्याद्री घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली.
शनिवार (१९ ऑक्टोबर)
सह्याद्री घाटमाथा, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव.
रविवार (२० ऑक्टोबर)
नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली.
🌦️ हवामान अंदाज
राज्यभर यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या काळात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेले धान, कापूस, सोयाबीन, ज्वारी, गहू बियाणे वाळवण तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.